छावा ब्रिगेड संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे तक्रार निवेदन दिले असून त्यात म्हंटले आहे की, दि. १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ९.२९ वाजेदरम्यान बाबा ढोकचौळे, रा. खंडाळा (ता.श्रीरामपूर ) यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी छावा ब्रिगेड संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री. राजेश शिंदे यांना जीवे मारण्याचे व खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. भ्रमणध्वनी वरून संभाषण करताना त्यांनी मद्य प्राशन केलेले होते. त्यामुळे फोन कट केला नाही. गावातील महिलेला ब्लाऊज फाडायला लावून राजेश शिंदे यास खोट्या गुन्ह्यात अडकवू. आपल्याकडे एक आमदार व एक मंत्री आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा काहीही करु शकत नाही. राजेश शिंदे याला घरातून उचलून आणून त्याला संपवून टाकले तरी आपले काही वाकडे होणार नाहीत. बाबा ढोकचौळे यांचे विधान होते की, आपल्याला काहीही करायची गरज नाही. माझेकडे असा व्यक्ती आहे की तो काहीही करु शकतो. असेही तक्रारीत म्हंटले आहे. भविष्यकाळात विशाल पुरुषोत्तम गोरे व बाबा ढोकचौळे यांचे माध्यमातून जीवीतास धोका निर्माण झालेला आहे. त्यांचे सोबत असणारे इतरांचा शोध घेवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. भविष्यात कोणताही प्रकारचा घातपात किंवा अपघात झाल्यास संबंधित व्यक्ती व त्याचे सहकारी जबाबदार असतील, असेही तक्रारीत स्पष्ट म्हंटले आहे. यावेळी विविध संघटनाचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीरामपूर : नांदूर ग्रामपंचायतीतील सरपंच महिलेचे पती विशाल गोरे तसेच खंडाळा ( ता.श्रीरामपूर ) येथील बाबा ढोकचौळे व त्यांचे सहकाऱ्यांनी छावा ब्रिगेड संघटनेचे पदाधिकारी राजेश शिंदे यांना जीवे मारण्याचे षडयंत्र केले असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार छावा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ वाघ यांनी पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्याकडे केली आहे. दरम्यान, या सर्व प्रकारचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. राजकीय व्यक्तीकडून पदाचा गैरवापर करून सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याने अशा अपप्रवृत्तीविरुद्ध सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत.