केंद्रातील भाजप सरकार विरोधात श्रीरामपूर युवकचे महिला आक्रोश आंदोलन


श्रीरामपूर : वाढत्या महागाईने जनता त्रस्त झाली असून सर्वसामान्य जनतेचे जगणे  मुश्किल झाले असल्याचे मत सौ.दिपाली ससाणे यांनी व्यक्त केले आहे . देशात वाढलेली महागाई, बेरोजगारी, तरुणांवर अन्याय करणारी अग्निपथ योजना, पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडर दरवाढ व जीएसटीमुळे देशातील अर्थव्यवस्था उध्वस्त झाली असून, याला सर्वस्वी मोदी सरकार जबाबदार आहे.

यावेळी मोदी सरकार विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव सौ दिपालीताई करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपुर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने महिला आक्रोश आंदोलन करण्यात आले.

          यावेळी मा.नगरसेविका सौ.संगिताताई मंडलिक,सौ.स्वातीताई छल्लारे, सौ.आशाताई परदेशी, सौ.दिपाली धनवटे,सौ.नागेश्वरी एडके,सौ.राणी देसर्डा,सौ.गुरमित चुग,सौ.गुरलित चुग,सौ.त्रिवेणी गोसावी, सौ.सविता अढांगळे,सौ.सुजाता बारगळ व इतर महिला सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post