स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'अशोक' च्या परिसरात पाच हजार वृक्ष लावण्याचे अभियान; माजी आ. मुरकुटे


श्रीरामपूर : स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अशोक कारखाना तसेच कारखाना संलग्न शैक्षणिक संकुलाच्या परिसरात यंदाच्या पावसाळ्यात पाच हजार वृक्ष लावण्याचे अभियान राबविले जाणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी दिली.

      या संदर्भात माहिती देताना श्री.मुरकुटे यांनी सांगीतले की, देशाच्या स्वातंञ्याला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त कारखाना तसेच संलग्न शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून पाच हजार वृक्ष लावण्यात येणार आहेत.
      येत्या १५ ऑगस्ट रोजी कारखाना कार्यस्थळावरील अशोक पॉलिटेक्निक कॉलेज, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,भास्करराव गलांडे पा. आय.टी.आय., रयत शिक्षण संस्थेचे भास्करराव गलांडे पा.विद्यालय,अशोक आयडियल स्कूल,अशोक इंग्लिश मिडीयम स्कूल, जि.प.प्राथमिक शाळा तसेच कारेगाव भाग शु.के.ट्रा. कंपनीच्या परिसरात ५०० झाडे लावून अभियानाचा शुभारंभ केला जाणार आहे. त्यानंतर टप्याटप्याने  सदरचे अभियान पावसाळा संपेपर्यंत पूर्णत्वास नेले जाईल, असे श्री.मुरकुटे म्हणाले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post