रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी समाजवादीचे भिक मांगो आंदोलन ; पालिका प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजवावे अन्यथा, समाजवादी पार्टी श्रमदानातुन खड्डे बुजविण्याची मोहिम हाती घेणार ; जोएफ जमादार


श्रीरामपूर : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरातील रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. पादचारी आणि वाहनचालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिका प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मोहिम हाती घेणे गरजेचे आहे. परंतु, शहरातील सामाजिक कार्यकर्ते, जनसामान्यांनी मागणी करुनही नगर पालिका प्रशासन कोणतीच पावले उचलत नसल्याने समाजवादी पार्टीच्या वतीने भिक मांगो आंदोलन छेडण्यात आले. यातून पैसे जमा करुन नगर पालिका प्रशासनास देणार असल्याचे पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी सांगितले.


रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनेक वाहनचालकांचे  खड्ड्यांमुळे वाहने खराब होत आहे. समाजवादी पार्टीच्या या भिक मांगो आंदोलनाद्वारे जमा झालेल्या पैशातुन नगर पालिका प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजवावेत. अन्यथा, पुढे श्रमदानाच्या माध्यमातून शहरातील खड्डे बुजविण्याची मोहिम हाती घेतली जाईल, असा इशारा जोएफ जमादार यांनी दिला आहे. यावेळी आसिफ तांबोळी, इमरान शेख,ज़करिया सैय्यद, कलीम वेल्डर, अरबाज़ क़ुरैशी, रिजवान बागवान, फरदीन शेख,रवी बोरसे,जीशान शेख आदि उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post