डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी सप्ताहाची यशस्वी परंपरा सुरू ठेवणारे सरला बेटचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांचे संत पूजन केले. याप्रसंगी देवगड संस्थांनचे प्रमुख गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज, ह भ प बाळू महाराज, दत्तात्रय बहिरट महाराज, सुदाम भाऊ पटारे, भाऊ भोईटे, भरत जाधव, मनीष पाटील ,बंटी पाटील उपस्थित होते. पूर्वी सरला बेट व सप्ताहाचा इतिहास मौखिक स्वरूपात बोलला जात होता, परंतु डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी सर्व माहिती संकलित करून सदगुरू योगीराज गंगागिरी ते सदगुरू नारायणगिरी महाराज हे प्रथम सरला बेटावरील सप्ताहाची महती सांगणारे सुंदर पुस्तक २०१५ साली लिहिले, व सुरुवातीलाच त्याच्या १० हजार प्रती विकल्या गेल्या. हे पुस्तक लिहिण्याचे प्रथम भाग्य मला मिळाले याबद्दल मनस्वी समाधान असल्याचे डॉ. वंदनाताई मुरकुटे म्हणाल्या.
लेने को हरिनाम व देने को अन्नदान...
ही सप्ताहाची अदभूत संकल्पना असून या सप्ताहाची कीर्ती व महती दिवसेंदिवस वाढत असल्याचे त्या म्हणाल्या. प्रत्येक भक्तगण येथून ऊर्जा घेऊन जातो. यावेळी मधुकर महाराज यांचा वाढदिवसानिमित्त डॉ.मुरकुटे यांनी सत्कार केला. सप्ताहातील भाकरी -आमटी मोठे आकर्षण असते.सप्ताहाला रामगिरी महाराजांनी मोठे स्वरूप दिलले आहे.वारकरी समाजाचा भक्ती मेळावा आहे, असे डॉ.मुरकुटे म्हणाल्या.