बेलापूर येथील श्री.हरिहर केशव गोविंद भगवान अखंड हरिनाम सप्ताह,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा,व किर्तन महोत्सव सन २०२२. गजर किर्तनाचा सोहळा भक्तीचा किर्तनमालेत ३ रे गुंफ बोलतांना ते बोलत होते.
यावेळी बोलतांना ते पूढे म्हणाले—देव ओळखण्यासाठी गुरु करावा लागतो,गुरु केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. देवाचे प्रेम आपणाला सांगता येत नाही.देव कोणालाच दिसत नाही.संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांना देव समोर आले असतांही ते त्यांना समजले नाही.
साधू, संताचे जीवन आपणाला जगता येणार नाही.आचाराने, विचाराने प्रत्येकाने आपले जीवन जगावे यासाठी संताच्या दिंड्या निघतात.परमेश्वराच्या प्राप्तीसाठी संत दुःखावर प्रेम करतात.संताचे चरण घरात आले तिथेच आनंद मिळतो.देव,देश, आणि धर्माची सेवा करा! मी वयाच्या १९ व्या वर्षापासून किर्तन सेवा करतो.माझ्या वडीलाच्या व राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराज बेलापूरकर यांच्या जन्मभूमीत किर्तन करण्याचा " योग" अाला यांचा मला आनंद होतो.असे त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी विष्णुपंत डावरे यांनी ह.भ. प. मोहन महाराज यांची कार्यक्रम स्थळी भेट घेवून " वारकरी संप्रदायातील वै.भानुदास महाराज यांचे " योगदान " या संत साहित्यासाठी पुण्यातील एका प्रकाशकांने प्रकाशित करण्याचा " मनोदय आहे.यासाठी वारकरी संप्रदायातील जुने जाणते शिष्य,वारकरी भाविकांकडे असलेले अप्रकाशित जुने लेख,स्वःताची हस्तलिखिते, दुर्मिळ फोटो पाठवावे.
साहित्य पाठविण्यासाठी संपर्क, विष्णुपंत गो.डावरे पत्रकार, लेखक, बेलापूर ता.श्रीरामपूर जि. अ नगर मो.नं. ९७६६६७४९८४