रेशन दुकानदार संघटनेचे विविध मागण्यांचे श्रीरामपूर तहसीलदारांना निवेदन


श्रीरामपूर (प्रतिनिधी ) : येथील श्रीरामपूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना संलग्न ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर्स फेडरेशन श्रीरामपूर शाखेच्यावतीने तहसिलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष माणिकराव जाधव, शिवाजी सैद, नरेंद्र खरात,संतोष वेताळ, विजय म्हस्के, प्रेम छतवानी आदी मान्यवर उपस्थित होते.


संघटनेच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. धान्य दुकानातून वितरित केला जाणारा माल, गोदामातून धान्य दुकानात पोहचल्यावर पुढे ३० दिवस वाटपास परवानगी मिळावी, दुकान आय. एस. ओ. प्रमाणीकरण करण्याची सक्ती करण्यात येवू नये. सन २०२१ ते २०२२ पर्यत मोफत धान्य वाटपाचे कमिशन त्वरीत मिळावे.bअशा प्रकारच्या इतर अनेक मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

           या निवेदनावर सोमनाथ देवकर, राहुल पगारे, मंगेश छतवानी, विकी काळे,विक्रांत क्षिरसागर, पप्पु तेलोरे, दिलिप त्रिभुवन, अतुल झिंरगे, प्रकाश गदिया.नरेंद्र खरात, भिका म्हस्के,अरुण खंडागळे, संगीता त्रिभुवन, आर. जी.काळे,सी.बी.गायकवाड, प्रेमकुमार छतवाणी, जे.एन. रणनवरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post