या संकल्पनेचा आरंभ करणारे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष व आरंभ सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री.रुपेश हरकल व अध्यक्ष योगेश ओझा यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी आरंभ सामाजिक प्रतिष्ठान, आर्ट ऑफ लिविंग व भाजपा युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्यासह भाजपाचे गणेश मुदगुले, श्रीरामपूर शहरातील प्रसिद्ध व्यापारी सतीश शेठ कुंकूलोळ, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश सौदागर, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय जाधव, ब्राह्मण संघटनेचे शहर अध्यक्ष सुबोध शेवटीकर, भाजपाचे प्रसाद बिल्डीकर, युवामोर्चाचे पंकज करमासे, विशाल अंभोरे, आरंभ प्रतिष्ठानचे अजय जनवेजा, लखन उपाध्ये, निलेश गीते, राजेंद्र कासलीवाल तेजस उंडे,प्रथमेश जोशी, निलेश कुसळकर, मंगेश भोसले प्रतीक वैद्य, रवी डिके, केदार यादव,अभिजीत केदारी आदि उपस्थित होते.
श्रीरामपूर : श्रीरामपूरच्या पुण्यभूमीत आरंभ सामाजिक प्रतिष्ठान, आर्ट ऑफ लिविंग व भाजपा युवा मोर्चा तर्फे गरीब व गरजूसाठी दर गुरुवारी 'गुरुप्रसाद' म्हणजेच अन्नदानाच्या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी (दि.४) श्रीरामपूर रेल्वे स्टेशन येथे करण्यात आला आहे. प्रथम अन्नदान श्री.योगेश ओझा यांच्या वतीने करण्यात आले.