गोंधवणी रस्ता परिसरात मुतारी नसल्यामुळे व्यवसायिकांची होतेय मोठी कुचंबणा ; स्वच्छतागृह बनविण्याची राहुल बागुल यांची मागणी


श्रीरामपूर : नगरपरिषद हद्दीतील अत्यंत वर्दळीच्या असणाऱ्या गोंधवणी रस्ता परिसरात मुतारी नसल्यामुळे येथील व्यवसायिकांची मोठी कुचंबना होत असून, या ठिकाणी त्वरित स्वच्छतागृह बनविण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल बागुल यांनी 'साईकिरण टाइम्स'शी बोलताना केली. यासंदर्भात पालिका प्रशासनाकडे निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

           गोंधवणी रोड परिसर हा सर्वाधिक रहदारीचा, दाट लोकवस्तीचा भाग आहे. शहरातील बहुसंख्या जनता याच परिसरात वास्तव्य करते. या रस्त्यालगत अनेक छोटे-मोठे व्यवसायिक, किराणा दुकानदार, गॅरेज, सलून, भाजीपाला विक्रेते असे विविध प्रकारचे व्यावसायिक असून, या सर्वांना लघुशंकेला जाण्यासाठी येथे मुतारीच नसल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. लोकांना लघुशंकेसाठी दूरवर जावे लागते. गोंधवणी रोडलगत पुरुषांसाठी तसेच महिलांसाठीही योग्य ठिकाणी स्वच्छतागृह बनविण्याची मागणी राहुल बागुल यांनी केली आहे.

        


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post