आरोग्य योजनांची माहिती न देणाऱ्या रूग्णालयांवर कारवाई करावी ; आरोग्य मित्र सुभाष गायकवाड यांची मागणी


श्रीरामपूर : अनेक मोठ्या रूग्णालयांमध्ये राज्यभरातून विविध आजारांनी ग्रासलेले गोरगरीब रूग्ण येत असतात. मात्र महागड्या उपचारांमुळे अनेकदा त्यांना उपचारांना मुकावे लागते. अशावेळी रूग्णालयांकडून रूग्णांना शासकीय योजनांची माहिती दिली जात नाही. अशा रूग्णांवर कारवाई करण्या यावी अशी मागणी येथील नागेबाबा प्रतिष्ठाणचे आरोग्यमित्र सुभाष गायकवाड यांनी केली.

          वरळी येथे रुग्णमित्र संस्था भेट उपक्रम अंतर्गत जीवनदायी भवन येथे रुग्णमित्रांची आढावा बैठक महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची कार्यप्रणाली जाणून घेण्यासाठी तसेच यामध्ये येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी ही बैठक रुग्णमित्रांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती. यावेळी गायकवाड यांनी वरील मागणी केली.

        गायकवाड यांनी धर्मदाय रूग्णालयात योजना लागू असतानाही अनेक आजार योजनेत बसत नाहीत, अशी एक ना अनेक कारणे सांगून रूग्णांना जेरीस आणले जाते. त्यांच्या नातेवाईकांना सहकार्य न करता योजनेसंबंधी माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. अशा रूग्णालयांवर कारवाई व्हावी. तसेच खुबे - सांधे - गुडघे बदल शस्त्रक्रिया, सामान्य शस्त्रक्रिया या योजनेत खासगी रुग्णालयात देखील व्हाव्या अशी मागणी केली असता डॉ. शिंदे यांनी या शस्त्रक्रिया सरकारी – खासगी वैद्यकीय महाविद्यालय तसेच सरकारी रुग्णालयात उपलब्ध असल्याची माहिती दिली.

                     यावेई डॉ. शिंदे म्हणाले, योजनेचा तळागाळात प्रचार, प्रसार होणे गरजेचे आहे. तसेच योजनेतील अपप्रवृत्तीला आळा बसवण्यासाठी रुग्णमित्रांनी सहकार्य करावे, योजना यशस्वी करण्यासाठी अपप्रवृत्तींना आळा बसवण्याची गरज व्यक्त केली. योजनेची व्यापकता व योजना कशाप्रकारे गरजू रुग्णांना दिलासा देते याची माहिती दिली. योजनेच्या व्यतिरिक्त काही रुग्णालये वरून काही रकमेची मागणी करतात याबाबत डॉ. सुधाकर शिंदे यांनी रुग्णांना तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. २५% खाटा या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत राखीव असतात, तसेच या योजनेबद्दल यांचे आवाहन जनजागृती होणे आवश्यक असणे गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

         राजेंद्र ढगे यांनी वसई- विरार महापालिका क्षेत्रातील सरकारी रुग्णालयात योजनांचा अभाव असल्याचे निदर्शनास आणून दिले. तर महात्मा फुले जनआरोग्य योजना वसई- विरार महापालिका क्षेत्रात सुरू करण्याची मागणी संस्कार सेवा संस्थेच्या पिंकी पाटील यांनी केली. रुग्णांसाठी मदत करणाऱ्या २५ हन अधिक संस्थांनी या बैठकीत सहभाग घेतला होता. भविष्यात या संस्था महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा तळागाळात प्रचार, प्रसार व योजनेतील अपप्रवृत्तीला आळा बसवण्याचे कार्य करतील अशी ग्वाही डॉ. शिंदे यांना दिली. यासाठी लागणारी शक्‍य ती मदत जीवनदायी भवनमधून रुग्णमित्रांना केली जाईल, असे आश्‍वासन डॉ. शिदे यांनी रुग्णमित्रांना दिला.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post