श्रीरामपूर काँग्रेसची अभूतपूर्व पदयात्रा ; आझादी गौरव पदयात्रेत ससाणे गटाचे मोठे शक्ती प्रदर्शन

श्रीरामपूर
: भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे मोठे योगदान राहिले असून, तळागाळातील सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम काँग्रेसनेच केल्याचे विधान परिषदेचे आ. सुधीर तांबे यांनी म्हटले.

      श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटी, श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटी, व स्वर्गीय जयंतराव ससाने मित्र मंडळाच्या वतीने आयोजित आजादी गौरव यात्रेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की भाजप सरकार जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असून ,हुकूमशाहीला खतपाणी घालण्याचे काम करत आहे. यानंतर मा उपनगराध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने म्हणाले ,  केंद्रातील भाजपा शासित राजवटीमध्ये देशात सगळीकडे भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूवर लावलेला जीएसटी, ईडी सारख्या शासकीय यंत्रणेचा गैरवापर व भाजपा सरकारची हुकूमशाही याविरुद्ध बुलंद आवाज उठवण्याची आता वेळ आलेली आहे. आजादी गौरव पदयात्रा हनुमान मंदिर ( रेल्वे स्टेशन ) पासून ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा  ते  महात्मा गांधी पुतळा, मेन रोड, भगतसिंग चौक, सिद्धिविनायक मंदिर या मार्गे जाऊन सांगता समारोप मातोश्री मंगल कार्यालय येथे झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड अण्णासाहेब थोरात होते. पावसाची तमा न बाळगता या पदयात्रेत मोठ्या संख्येने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे  सहभाग नोंदवला. यानंतर शिर्डी साईबाबा संस्थान चे विश्वस्त सचिन गुजर म्हणाले ,  देशाच्या तसेच श्रीरामपूर च्या विकासात काँग्रेस पक्षाचे मोलाचे योगदान आहे. नगर जिल्ह्यात संगमनेर नंतर श्रीरामपूर ची पदयात्रा  सर्वात मोठी असल्याचे म्हटले. यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे म्हणाले , श्रीरामपूर तालुक्यातील जनतेच्या मना मनात काँग्रेस भिणलेली असून स्वर्गीय ससाने  साहेबांच्या विचारांनी आमची संघटना एक विचाराने जोडलेली आहे. महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले म्हणाले , काँग्रेसने सर्वधर्मसमभाव जपला असून , लोकशाही जिवंत ठेवली आहे. यानंतर भारत भवार म्हणाले, कृषी तंत्रज्ञान, शिक्षण, माहिती , उद्योग  यांच्या माध्यमातून देशाला काँग्रेसनेच पुढे नेले आहे. 

              सुधीर नवले म्हणाले, श्वेतक्रांती, हरितक्रांतीच्या माध्यमातून काँग्रेसने देशात अमुलाग्र बदल घडवून आणले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस दिपाली ससाने म्हणाल्या,  देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात गांधी परिवाराचे योगदान मोठे असून काँग्रेसमध्ये काम करताना मला अभिमान वाटतो.

                       यानंतर सरवरअली मास्टर, राणी ताई देसरडा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड अण्णासाहेब थोरात, जि प चे माजी सभापती बाबासाहेब दिघे, राजेंद्र पाऊलबुद्धे, मा नगरसेवक शशांक रासकर, मुजफ्फर शेख, आशिष धनवटे,  मनोज लबडे, सुहास परदेशी, सुभाष तोरणे, के सी शेळके, लक्ष्मण कुमावत, राजेंद्र आदिक, राजेंद्र सोनवणे, मुन्नाभाई पठाण, प्रवीण नवले, सिद्धार्थ फंड,  रावसाहेब आल्हाट, सरबजीत सिंग चूग, युवराज फंड, दीपक वमने, गोपाल लिंगायत, जाफर शहा, रितेश एडके,प्रसाद चौधरी, राहुल बागुल, सुरेश ठुबे, जावेद शेख, रियाज खान पठाण, भैया भाई अख्तार,  संतोष परदेशी, राहुल शिंपी, भास्करराव लिफ्टे, द्वारकानाथ बडदे, भारत तुपे, सुरेश भडांगे, प्रमोद भोसले, विठ्ठलराव गागरे,  माणिकराव देसाई, कार्लस साठे, सोपानराव औताडे,प्रताप देसाई, सरपंच शिंदे, गणेश छल्लारे, रावसाहेब चक्रनारायण, कुणाल पाटील, अमोल गुजर, साईनाथ गिरमे, बी एम पुजारी, सुरेश भडांगे, योगेश बडदे, लक्ष्मण खरात, शरद बनकर, नितीन थोरात, सागर मुठे, उत्तमराव  बनसोडे, सागर बढे, मनीष पंचमुख,अशोक पवार, बाबा वायदंडे, संजय साळवे, सुनील माळवे,नवाज शेख, विशाल साळवे, निलेश बोरावके, मर्चंट चे चेअरमन मुथा,  अशोक शिवरकर, राजू शिरसाठ, अशोक जगवार, गोपाल भोसले, रियाज पोपटिया, विलास लबडे, लक्ष्मण शिंदे,लहानु त्रिभुवन , विजय शिंदे, गणेश काते, संजय गोसावी, निलेश नागले, तेजस बोरावके, कुंदनसिंग,सौ.मंगल ताई तोरणे, त्रिवेणी गोसावी, सुजाता ताई बारगळ, आदी काँग्रेसचे कार्यकर्ते व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post