राहाता तालुक्यातील विनापरवाना वीटभट्ट्यावर कारवाई करा ; 'छावा ब्रिगेड'चे राजेश शिंदे यांचे उपोषण


राहाता : राहाता तालुक्यातील पिंपळवाडी व परिसरात शासनाचे नियम पायदळी तुडवुन बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या वीटभटयांवर तक्रारी करून प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नसल्याने राहाता तहसील कार्यालयासमोर १२ सप्टेंबर रोजी 'छावा ब्रिगेड सेनेचे' उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजेश शिंदे उपोषणास बसणार आहेत. यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

'छावा'चे राजेश शिंदे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, राहाता तालुक्यातील पिंपळवाडी परिसरात  मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या असून, शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवुन बेकायदेशीरपणे चालू आहे. शेकडो विटभट्या विनापरवाना चालु आहे. या विटभट्या विनापरवाना माती उत्खनन करतात.  मोठया प्रमाणात प्रदुषण होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे. वीटभटया सुरु करण्यासाठी शासनाचे नियम व अटी असतात. हे सर्व नियम विटभटया धारकांनी पायदळी तुडविलेले आहे. वीटा तयार झाल्यावर वाहतुक परवाना घेणे आवश्यक असतानाही नको त्या वाहनामध्ये वाहतुक देखील केली जातात. त्यामुळे बरेच अपघात ही झालेले आहे. संबधित वीटभट्टीधारकांवर योग्य ती कारवाई करुन वीटभटया बंद करण्यात याव्यात, अन्यथा  छावा ब्रिगेडच्या वतीने दि. १२ सप्टेंबर रोजी उपोषण करण्यात येईल, असा इशारा राजेश शिंदे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post