श्रीरामपुर शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी चव्हाणके, तर उपाध्यक्षपदी शेख


श्रीरामपूर : श्रीरामपुर शहर युवक काँग्रेस शहराध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडीचा प्रस्ताव मी स्वतः महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव या नात्याने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या दि.२५ ऑगस्ट रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये सादर केल्याचे प्रतिपादन दिपालीताई ससाणे यांनी केले आहे.

        यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रभारी मितेंद्र सिंग, उत्तर महाराष्ट्र प्रभारी वंदनाजी बेन,प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, उत्तर महाराष्ट्र प्रभारी तथा उपाध्यक्ष प्रशांत ओगले हे उपस्थित होते. वरील सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वानुमते श्रीरामपुर शहर युवक काँग्रेस "अध्यक्ष" व "उपाध्यक्ष" पदांच्या नावाला मंजुरी मिळाली. सदर नियुक्तीपत्र उपाध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र प्रभारी या नात्याने मा.प्रशांत ओगले यांनी प्रसिद्ध केले. सदर पत्रावर उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रभारी वंदनाजी बेन यांची स्वाक्षरी नसल्यामुळे अनेक राजकीय घडामोडी घडत, सदर नियुक्त्यांना स्थगिती मिळाली,  असे पत्र प्रसिद्ध झाले.परंतु, सदर नियुक्त्या राष्ट्रीय युवक काँग्रेसकडुन मान्यताप्राप्त झाल्याचे पत्र मिळाले असुन श्रीरामपुर शहर युवक काँग्रेस अध्यक्षपदी श्री.रितेश चव्हाणके व उपाध्यक्षपदी श्री.शाहरूख शेख यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले असल्याचे सौ.ससाणे यांनी म्हटले आहे.

            नवनियुक्त शहराध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे माजी मंत्री , विधी मंडळ पक्षाचे नेते आ.बाळासाहेब थोरात,आ.डॉ.सुधीर तांबे,युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.बी व्ही श्रीनिवासजी,प्रदेशाध्यक्ष मा.कुणाल राऊत , जिल्हा सहकारी बँकेचे संचालक करण ससाणे,शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, शहर अध्यक्ष संजय छल्लारे ,प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले, श्रीरामपूर विधानसभा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ फंड यांनी अभिनंदन केले आहे.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post