बेलापूर बुll ग्रामपंचायतीची १ आॕगष्ट१९२२ रोजी स्थापना झाली त्यास शंभर वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या वतीने शताब्दी सोहळा आयोजित करण्यात आला.गावात अनेक ठिकाणी सडा रांगोळ्या काढण्यात आल्या. अनेकांनी शताब्दी सोहळ्याचे फलक लावून आनंद व्यक्त केला. ग्रामपंचायत इमारतीची रंगोटी , विद्युत रोषणाई तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य सोहळा पार पडला.प्रारंभी छपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन समारंंभास प्रारंभ झाला. त्यांतर भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर ,प्रबोधनकार शाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य टिळक यांचे पुण्यतिथीनिमित्त त्यांचे प्रतिमेस ज्येष्ठ नागरिक गणपतशेठ मुथा ,कनजीशेठ टाक व सुवालालजी लुक्कड यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्थापनेपासून तर आजवरचे दिवंगत सरपंच स्व.पेमराज मुथा,स्व.जयंतराव पा. नाईक, स्व.शंकरलाल खटोड,स्व.भिवराज पां नाईक,स्व.शंकरराव पां.नाईक,स्व.दामोधर पां.नाईक,स्व.रामबिलास सोमाणी,स्व.भागवतराव पा.खंडागळे ,स्व.भागवतराव खंडागळे ,स्व.घमाजी कु-हे,स्व.जबाजी अमोलिक,स्व.उत्तमराव अमोलिक यांचे रणजित श्रीगोड,शरद सोमाणी,शिवाजी वाबळे,सुधाकर खंडागळे ,जालिंदर कु-हे,प्रकाश पां.नाईक,चंद्रकांत नाईक ,शरद देशपांडे,हाजी इस्माइल शेख,प्रशांत लढ्ढा,शांतिलाल हिरण,पञकार सुहास शेलार,दिपक क्षञिय,दिलिप दायमा,किशोर कदम,.रावसाहेब अंकल अमोलिक,बेलापूर पञकार संघाच्या वतीने भास्कर खंडागळे यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात येवून सामुदायिक श्रध्दांजली अर्पिण्यात आली.
यानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेन्द्रजी मोदी यांनी स्वातंञ्याच्या पंचाहत्तर वर्षपूर्ती निमित्त' घर घर तिरंगा अभियान'च्या फलकाचे माजी सरपंच सौ.राधाबाई बोंबले,ग्रामपंचायत सदस्य स्वाती अमोलिक,सौ.तबस्सुम बागवान,सौ.प्रियंका कु-हे,सौ.,सौ.शिला पोळ,सौ.रंजना बोरुडे,माजी सदस्य सौ.नंदा पवार,सौ.शिरीन शेख यांचे हस्ते अनावरण करण्यात आले. शताब्दी सोहळ्याचे औचित्य साधून शालेय मुलांना प्रातिनिधीक स्वरुपात गणवेश वाटप करण्यात आले.त्यानंतर वृक्ष वाटप करण्यात आले. उपसरपंच अभिषेक खंडगळे यांनी ग्रामपंचायत स्थापना तसेच शताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.याप्रसंगी जि.प.सदस्य शरद नवले,सरपंच महेन्द्र साळवी,सदस्य भरत साळुंके,रविन्द्र खटोड,बाजार समिती संचालक सुधीर नवले,माजी उपसभापती दत्ता कु-हे,शरद सोमाणी,रणजित श्रीगोड,विष्णुपंत डावरे,सुधाकर खंडागळे ,तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे,स्वाती अमोलिक, चंद्रकांत नाईक,विलास मेहेञे.,हाजी इस्माईल शेख,मोहसीन सय्यद,एकनाथ नागले आदिंनी मनोगत व्यक्त केले.ग्रामसेवक राजेश तगरे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास माजी जि.प.अध्यक्ष मिस्टर शेलार,पं.स.माजी सभापती दत्ता कु-हे,पं.स.सदस्य अरुण पा.नाईक, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले,मुश्ताक शेख,रमेश अमोलिक तसेच भास्कर बंगाळ,भाजपचे युवा नेते प्रफुल्ल डावारे,मनिष मुथा,पोलिस पाटील अशोक प्रधान, अनिल पवार,प्रशांत मुंडलिक,जनार्धन आहोळ,मधुकर अनाप,दादासाहेब कुताळ,भगवान मोरे,मच्छिंद्र पुंड,सचिन अमोलिक,रमेश शेलार.केशव अंबिलवादे,रत्नेश गुलदगड,तस्वर बागवान,महेश कु-हे,प्रभात कु-हे,बाळासाहेब शेलार,नामदेव बोंबले,पंडीतराव बोंबले,राहुल माळवदे,नितिन नवले,अरविंद साळवी,गयाज पठाण,बाळासाहेब बारगळ,अल्ताफ शेख,मास्टर हुडे आदिंसह ग्रामस्थ ,ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.