शेतमजुरांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी श्रमिक महासंघाचे तहसील कार्यालयावर निदर्शने


श्रीरामपूर : शेतमजुरांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करून त्यांना रोजगार, जमीन, घर, खाद्य सुरक्षा, शिक्षण,आरोग्य, वेतन व सामाजिक न्याय यांस अनुसरून विविध २९ मागण्यांची सनद तातडीने मंजूर करावी, याकरिता पुकारण्यात आलेल्या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ व अहमदनगर जिल्हा शेतमजूर युनियनच्या वतीने तहसील कार्यालयावर निदर्शने  करण्यात आली.

यावेळी मा.पंतप्रधान व मा.मुख्यमंत्री यांना मा. तहसीलदार, श्रीरामपूर यांचेमार्फत निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार मगरे मॅडम यांनी निवेदन स्वीकारले. देशव्यापी शेतमजूर परिषेदेत विविध संघटनांनी  मंजुर केलेल्या 29 मागण्यांना घेउन दि.1आगस्ट 2022 रोजी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचे जयंती दिनी देशभर जिल्हा / तालुका स्तरावर देशव्यापी मागणी दिन साजरा करून निवेदन देण्यात आले.सदर निवेदनात  मनरेगा अंतर्गत 600/- रु मजुरी व प्रती जॉब कार्ड धारकास प्रतिवर्ष 200 दिवस काम देण्यात यावे. मनरेगा योजनेत काम करणा-या तांत्रिक कर्मचारी व अन्य कर्मचा-यांचे नोकरीची हमी द्यावी.मनरेगा शहरी भागात ही लागु करावा, सर्व भुमिहीन,बेघरांना घरासाठी जागा, किचन, गार्डन, शौचालय व गोठा ( जनावरांसाठी ) इत्यादीसह किमान 5 लाख रु.किमतीचे घरकुल द्यावे, 55 वर्षावरील सर्व स्त्री पुरुष शेतमजुरांना दरमहा 5000/- रु.पेंशन देण्यात यावी, स्वातन्त्र्याच्या अम्रुत महोत्सव वर्षी कसेल त्याची जमीन या जमीन आंदोलनाचे वेळेस घोषणा केल्याप्रमाणे सिलिंगच्या वरकड जमीनीचे, सरकारी पडिक जमीनीचे  गरीब, शेतमजुर, दलित, आदिवासी व गरिब शेतकरी यांना कब्जा व आर्थिक सहाय्य यांसह वितरण करा,अनुसुचित जाती,जमाती करिता मोबदला व पर्यायी शेतजमीन देण्याच्या विशेष तरतुदीसह जमीन अधिग्रहण कायदा 2013 लागु करा.पुनर्वसन केल्याशिवाय जमीनीवरुन हुसकावणे किवा विस्थापन करु नये. पनर्वसनाचे ठिकाणी योग्य निवासाची,  शिक्षण व आरोग्यसेवेची सोय असावी,वनाधिकार कायदा 2005-06 पुर्णत: अमलात आणा.सर्व वननिवासी जनतेच्या अर्थजन /उपजिविकेचे रक्षण करा. रोजगार निर्मिती आणि पर्यावरण रक्षणासाठी व्यापक वनीकरणाची योजना राबवुन त्यावर त्या भागातील शेतमजुर व ग्रामिण मजुरांची प्राधान्याने भर्ती करा,सार्वजनिक वितरण प्रणाली व्यापक व भक्कम करुन त्याद्वारे तांदुळ,गहु या शिवाय डाळी, तेल, साखर, मसाले,भाजीपाला व इतर जिवनावश्यक वस्तुंचा स्वस्त दारात पुरवठा करा यासह विविध मागण्या सोडविण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी आंदोलनात श्रमिक महासंघाचे राज्याध्यक्ष  कॉ. बाळासाहेब सुरुडे, कॉ.राजेंद्र बावके,कॉ.शरद संसारे, कॉ. जीवन सुरुडे, कॉ. श्रीकृष्ण बडाख, राजेंद्र मुसमाडे,उत्तम माळी, प्रकाश भांड,हसन शेख,बाळासाहेब कराळे, रंगनाथ दुशिंग, नानासाहेब तारडे, आसरू बर्डे,अनिल बोरसे,प्रकाश मोरे,अजय बर्डे,नितीन दरदले,अजय बत्तीशे आदि सह मोठया संख्येने  कार्यकर्ते हजर होते .
                     

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post