डाक विभागाच्या वतीने रुपये ३९९ मध्ये नागरीकांचा दहा लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविला जाणार आहे. यात अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख रुपये कायमचे अपंगत्व आल्यास दहा लाख रुपये दवाखाना खर्च रुपये ६० हजार दोन मुलांना शिक्षणाचा खर्च अपघाताने पँरालिसीस झाल्यास १० लाख रुपये भरपाई दिली जाणार आहे. वय वर्ष १८ ते ६५ असणाऱ्या नागरीकासाठी एकच हप्ता आसणार आहे. यात सर्व प्रकारचे अपघात सर्पदंश विजेचा शाँक फरशीवरुन घसरुन पडणे आदिंचा समावेश असल्याची माहीती डाक विभागाच्या वतीने देण्यात आली. बेलापुर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संस्थेच्या सर्व सभासदांचा विमा विनामूल्य उतरविला जाणार असुन सभासदांनी आधार कार्ड व मोबाईल सोबत आणावा तसेच सर्व सभासदांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे अवाहन संस्थेचे चेअरमन सुधीर नवले व्हा चेअरमन पंडीतराव बोंबले व सर्व संचालकानी केले आहे.
या वेळी डाक विभागाचे जालींदर चव्हाण श्रीमती पुनम ओहोळ राहुल पारधे विलास गायकवाड संदीप वाकडे राजन पवार शिवाजी पोटभरे तसेच मा जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी सदस्य चंद्रकांत नवले विलास मेहेत्रे सुधाकर खंडागळे प्रफुल्ल डावरे पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा सुहास शेलार किशोर कदम मुसा शेख महेश कुऱ्हे सचिन वाघ राहुल माळवदे मोहसीन सय्यद भाऊसाहेब कुटे मनोज कुटे प्रसाद साळूंके मुस्ताक शेख आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते शेवटी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी आभार मानले.