महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले दिपक सिंगला, प्रदेश सचिव धनंजय शिंदे, यांनी शिर्डी येथे साईदर्शन घेतले. यावेळी दीपक सिंगला बोलत होते. आज देशामध्ये सत्ताधारी पक्षांनी विरोधकांना संपविण्याचे कटकारस्थान रचले आहे. कायमस्वरुपी कोणीही सत्तेमध्ये राहत नाही. राजकारणामध्ये चढ-उतार ठरलेले असतात याचे भान सत्तेवर असलेल्या पक्षांनी ठेवावे. वेगवेगळ्या चौकश्या करुन अनेक मोठ्या नेत्यांना दहशतीखाली ठेवण्यात येते. सुज्ञ मतदार काय चालले ते पाहतोय, महाराष्ट्रामध्येही मोफत वीज, आरोग्य सुविधा, शिक्षणाचा दर्जा, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या पहिली ते दहावी पर्यंतचे शाळेचे वर्ग डिजीटल करण्यासाठी आम आदमी पार्टी प्रयत्न करणार आहे.या सोबतच येत्या सर्वच निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी स्वबळावर पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे देखील सिंगला यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रदेश सचिव धनंजय शिंदे मनाले की केंद्रातील भाजप सरकारने आपल्या अनेक श्रीमंत अब्जाधीश मित्रांची बँकांची दहा लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केली आहेत. त्याचप्रमाणे बड्या आणि श्रीमंत लोकांचे पाच लाख कोटींचे करही माफ केले आहेत. यातील अनेक लोक भाजप नेत्यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे केंद्र सरकारचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. हि आर्थिक तूट भरून काढण्यासाठी त्यांनी सर्वसामान्यांच्या खाद्यपदार्थांवर जीएसटी सारखा कर लावला. आता केंद्रातील भाजप सरकार सर्वसामान्यांना मोफत शिक्षण, सरकारी रुग्णालयातील मोफत उपचार, मोफत रेशन आदी सर्व मोफत सुविधाही बंद करणार असल्याचे सांगत आहे. ही बाब अत्यंत निंदनीय आहे.
केंद्रातील भाजप सरकारने आपल्या अनेक श्रीमंत अब्जाधीश मित्रांची बँकांची दहा लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केली आहेत. त्याचप्रमाणे बड्या आणि श्रीमंत लोकांचे पाच लाख कोटींचे करही माफ केले आहेत. यातील अनेक लोक भाजप नेत्यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे केंद्र सरकारचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. हि आर्थिक तूट भरून काढण्यासाठी त्यांनी सर्वसामान्यांच्या खाद्यपदार्थांवर जीएसटी सारखा कर लावला. आता केंद्रातील भाजप सरकार सर्वसामान्यांना मोफत शिक्षण, सरकारी रुग्णालयातील मोफत उपचार, मोफत रेशन आदी सर्व मोफत सुविधाही बंद करणार असल्याचे सांगत आहे. ही बाब अत्यंत निंदनीय आहे.
आज भाजपा प्रणित सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतलेले माननीय मंत्री अब्दुल सत्तार यांच्या चार मुलांची नावे टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी शासनाकडून दोषी म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. एकूण ७८७० नावांची यादी शासनाने TET परीक्षेत अनैतिक मार्गाचा अवलंब केला म्हणून जाहीर केली आहे त्यातील ही चार नावे आहेत मंत्री माननीय अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य किरण उपकारे, आप जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवार, किसन आव्हाड, तालुकाध्यक्ष विकास डेगळे, जिल्हा सचिव राहुल रणपिसे जिल्हा कोषाध्यक्ष दिनेश जाधव, जिल्हा प्रवक्ते प्रवीण जमदाडे, भरत डेंगळे, श्रीधर कराळे, नेवासा तालुका अध्यक्ष राजू आगाव, शहराध्यक्ष संदीप पालवणे सादिक शिलेदार आदी उपस्थित होते.