श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील वार्ड क्रमांक २ परिसरातील नागरिकांना महाराष्ट्र बँकेत खाते उघडण्यास मनाई केली जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याबाबत समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी बँक व्यवस्थापनास खाते का उघडले जात नाही? याचा लेखी जाब विचारला असून, महाराष्ट्र बँकेविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही शाखाधिकाऱ्यांना दिला आहे.
बँक व्यवस्थापनास दिलेल्या पत्रात जमादार यांनी नमुद केले आहे की, शहरातील वार्ड नं. २ या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांची नवीन खाते न उघडणेकामी आपल्या कार्यालयास आपल्या वरिष्ठ कार्यालयाकडून काही लेखी सुचना, आदेश आले असल्यास त्याची प्रत द्या. जर तसे आदेश नसतील तर याच भागातील नागरिकांच्या नवीन कुठल्याही प्रकारचे खाते आपले शाखा कार्यालयातून का उघडले जात नाही? असा सवाल करत याचा लेखी खुलासा मागितला आहे.
यावेळी समाजवादी पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार, आसिफ तांबोळी,अब्दुल सैय्यद, मतीन शेख, अनिल इंगळे, ज़करिया सैय्यद, अमीर खान, शकूर शेख आदी उपस्थित होते.