भुवनेश्वर (ओडिशा) ४/८/२०२२(गौरव डेंगळे) : नाखोन पथोम,थायलंड येथे दिनांक ७ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान वरिष्ठ पुरुष गट आशियाई व्हॉलिबॉल स्पर्धा रंगणार आहे.या स्पर्धेसाठी १२ सदस्य भारतीय संघ आज ओडिसाहुन रवाना झाला आहे. भारतीय संघाचं नेतृत्व दुष्यांत सिंगकडे सोपविण्यात आले आहे. तर संघाचे प्रशिक्षक म्हणून श्रीधरन हे काम पाहातील.२२ जुन ते ४ ऑगस्ट दरम्यान भारतीय संघाचे सराव शिबिर बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियम,भुबनेश्वर येथे आयोजित करण्यात आले होते. १२ खेळाडूंसोबत ६ ऑफिशियल या स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत.
यजमान थायलंड, कोरिया, इराण, ऑस्ट्रेलिया व उझबेकिस्तान, जपान, चीन, चायनीज तैपेई,कझाकस्तान, भारत व फिलिपाइन्स असे एकूण ११ राष्ट्र सहभागी झालेले आहेत. आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाला,व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्री अच्युत समनता,आशियाई व्हॉलीबॉल कोन फेडरेशनचे सदस्य श्री रामावतार सिंह जाखड,व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव श्री अनिल चौधरी तसेच सर्व राज्य संघटनेने हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन केले.
भारतीय संघ पुढीलप्रमाणे
१.दुष्यांट सिंग (कर्णधार)
२. तनिष चौधरी
३.हर्षित गिरी
४. अमन कुमार
५.जिबिन जॉब
६. सचिन धगर
७. मंनात चौधरी
८. अजीत शेखो
९. कार्तिकेय (लिबेरो)
१०. सूर्यप्रकाश (लिबेरो)
११. अक्षय कुमार
१२. संदिप
ऑफिसियल
१.कुलदीप मगोट्रा
(व्यवस्थापक)
२.श्रीधरन
(मुख्य प्रशिक्षक)
३.प्रवीण शर्मा
(सहाय्यक प्रशिक्षक)
४.राजेश कुमार
(सहाय्यक प्रशिक्षक)