अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी संपूर्ण कार्यकर्ते यांच्या वतीने यावेळेस करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्यचे शिल्पकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी कामगार नेते नागेश सावंत,आम आदमी चे तिलक डुंगरवाल, विकास डेंगळे, राहुल रणपिसे,ऑड प्रवीण जमदाडे, यांनी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारांना उजळणी देत मनोगत व्यक्त केले,कार्यक्रमात या थोर पुरुषांना अभिवादन करत प्रतिमेचे पूजन केले, या प्रसंगी कामगार नेते नागेशभाई सावंत, आजचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवार, तालुका अध्यक्ष विकास डेंगळे, जिला सचिव राहुल रणपिसे, प्रवक्ते ऑड, प्रविण जमधडे, भरत डेंगळे, डॉ प्रवीण राठोड, सलीम शेख, मनोज गाडे, पिंटूभाऊ बोंबले, गणेश राऊत, बि एम पवार, अक्षय कुमावत,यशवंत जेठे,ऑड दिनेश यादव, दीपक परदेशी, सचिन आजगे, रमेश भोर, राज मोहम्मद शेख, आदी करकर्ते उपस्थित होते.
श्रीरामपूर : सातत्याने सामाजिक कार्यात सहभागी होऊन समाजात सामाजिक बांधिलकी जपत समाज कार्यात आम आदमी पार्टी नेहमीच अग्रेसर असते. श्रीरामपुरात मागील काळात पार्टीच्या वतीने विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. देशाच्या जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान देणारे देशभक्त महापुरुष यांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करून त्यांच्या विचारांना समाजात जिवंत ठेवण्याचे काम आम आदमी पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रचारक तिलक डुंगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने केले जाते. १ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो अशा प्रकारच्या वेगवेगळ्या घोषणा देऊन जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.