सोयाबीन, कपाशी यासारख्या खरीप हंगामातील पिकांची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते, फवारणी, मशागती यासाठी मोठा खर्च झालेला आहे. परंतु, पीक अतिशय चांगले आलेले असताना सोयाबीन,कपाशी यासारख्या खरीप हंगामातील पिकांवर यलो मोझाईक व गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. त्यामुळे श्रीरामपूर मतदारसंघातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. रोगग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यासाठी श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने मा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे, साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड अण्णासाहेब थोरात, जि प चे माजी सभापती बाबासाहेब दिघे, श्रीरामपूर दूध संघाचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, द्वारकानाथ बडदे, प्रतापराव देसाई, सुरेश शिंदे, मंगलसिंग साळुंके, निलेश नागले, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमोल नाईक, आकाश जावळे उपस्थित होते.