श्रीरामपूर : तालुक्यातील उक्कलगाव येथील प्रगतशील शेतकरी नामदेव मारुती पाटील थोरात यांच्या स्मृतीदिनानिमित्त उक्कलगाव प्राथमिक शाळेत रविवार दि.२८ ऑगस्ट २०२२ रोजी सर्वरोग आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून अशोक साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे हस्ते या शिबीराचे उद्घाटन होणार आहे, तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक रावसाहेब थोरात असणार आहेत.
या शिबीराचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कामगार हॉस्पिटीचे डॉ.रविंद्र जगधने, नगरच्या अरुणोदय सुपर स्पेशालिटीचे डॉ.शशिकांत फाटके, डॉ.सौ.वंदना फाटके, सरपंच नितीन थोरात आदी उपस्थित राहणार आहेत.
शनिवारी रुग्णांनी नाव नोंदणी बरोबरच रक्त तपासणी करुन त्या आधारावर दुसर्या दिवशी दंतरोग व मुख कर्करोग तपासणी, उच्च रक्तदाब व मधुमेह तपासणी, स्त्री रोग व गर्भवती महिलांची तपासणी, अस्थीरोग तपासणी केली जाणार असून डॉ.शशिकांत फाटक, डॉ.श्रद्धा धोत्रे, डॉ.तन्वी भंडारे, डॉ.तुषार तनपुरे, डॉ.गिरधारी जेधे, डॉ.निलेश भुसारी हे रुग्णांवर उपचार करणार आहेत. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिबीराचे संयोजक तथा अशोक सहकारी बँकेचे कार्यकारी अधिकारी प्रदीप थोरात यांनी केले आहे.