या अभिनव उपक्रमाबद्दल बोलताना आयोजक केतन खोरे म्हणाले की, श्रीरामपूर शहराच्या जडणघडणीत सर्व ज्येष्ठांचा मोलाचा वाटा आहे. मागील पिढीने पोस्ट कार्ड ते सोशल मीडिया, रेडिओ ते एलईडी टीव्हीपर्यंतचा आधुनिक काळ बघितला आहे. या पिढीच्या ऋणातून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न आहेत. ज्येष्ठांचे संस्कार, मार्गदर्शन घेऊन पुढील काळात सामाजिक कार्य करण्याचा मानस खोरे यांनी यावेळी व्यक्त केला. मोरया फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे माजी नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांनी आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले.
या अभिनव उपक्रमाची सुरवात प्रभाग क्रमांक १७ मधील युवा शक्ती मित्रमंडळ चौक, लबडे वस्ती येथून करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक अरुण कुलकर्णी, त्रिलोकीनाथ अग्रवाल, लढढा भाभी, कडूभाभी पठाण, लता मुळे, अशोक सबनीस, मंगल सबनीस, सुमन अग्रवाल, विश्वनाथ शेलार, सुशीला शेलार, कुलकर्णी आजी, नंदलाल पांडे, निर्मला पांडे या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान श्रीमती शिलाताई खोरे, डॉ.स्वाती चव्हाण, सुनील चोथे, छाया चोथे, राजेंद्र रेडी, दिनेश दीक्षित, राजेंद्र ढुस, राहुल रूपनर, कुणाल दहीटे, श्रद्धा खैरनार आदींच्या शुभहस्ते करण्यात आला.