अशोक कारखान्याच्या आगामी सन २०२२-२३ च्या गळीत हंगामासाठीची हंगामपूर्व मशिनरी दुरुस्ती व देखभालीची कामे प्रगतीपथावर आहेत. यंदाचा गळीत हंगाम निर्धारीत वेळेत सुरु व्हावा यादृष्टीने कारखाना व्यवस्थापन योग्य ती खबरदारी घेत आहे. मशिनरी देखभाल व दुरुस्तीसाठीची योग्य ती तजवीजही करण्यात आली आहे. हंगामपूर्व कामांसाठी कालबध्द कार्यक्रम आखण्यात आला असून त्यानुसार संबंधित अधिकारी व कर्मचारी अंमलबजावणी करीत आहे.
मिल रोलर बसविण्याचा कार्यक्रम चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे हस्ते उत्साहात संपन्न झाला. यावेळी माजी चेअरमन कोंडीराम उंडे, व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे, संचालक सोपानराव राऊत, मंजुश्री मुरकुटे, हिंमतराव धुमाळ, आदिनाथ झुराळे, बाबासाहेब आदिक, वाय.जी.बनकर, अमोल कोकणे, प्रफुल्ल दांगट, पुंजाहरी शिंदे, अच्युत बडाख, योगेश विटनोर, कार्यकारी संचालक संतोष देवकर, कामगार संचालक गिताराम खरात, अशोक पारखे, भाऊसाहेब बनसोडे, अधिकारी बाळासाहेब उंडे, प्रमोद बिडकर, लव शिंदे, कृष्णकांत सोनटक्के, सुनिल चोळके, भाऊसाहेब दोंड, सतिष झुगे, गोरख पटारे, विलास लबडे, बाबासाहेब तांबे आदिंसह कर्मचारी उपस्थित होते.