यावेळी मा उपनगराध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे म्हणाले, स्वातंत्रपूर्व काळापासून आत्तापर्यंत काँग्रेसचे देशासाठी महत्वाचे योगदान आहे. केंद्रातील भाजप सरकार हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असून सरकारची जिवनावश्यक वस्तूंवर कर लावण्याइतकी मजल गेली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. सध्या राज्यघटनेच्या अस्तित्वला धोका निर्माण झाला आहे. अशावेळी काँग्रेस पक्षाचा गौरवशाली इतिहास सांगणे व सध्य परिस्थितीची जाणीव जनतेला करून देण्यासाठी ही पदयात्रा आयोजित केली आहे.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे म्हणाले, देशाच्या वाटचालीत काँग्रेसचा मोठा वाटा आहे. सध्याची राजवट देशात दहशत निर्माण करणारी असून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. यानंतर जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे म्हणाले, महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून मोदी सरकारने दडपशाहीचे धोरण अवलंबले असल्याचे सांगत मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
यावेळी शिर्डी संस्थान चे विश्वस्त सचिन गुजर म्हणाले, काँग्रेस हा पक्ष नसून एक विचारधारा आहे.केंद्रातील हुकूमशाही सरकारच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी ही पदयात्रा अत्यंत महत्वाची आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले यांनी अखिल भारतीय काँग्रेसचे स्वातंत्रपूर्व काळापासून आत्तापर्यंत देशाबद्दलच्या योगदानाबाबत माहिती दिली.
शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय छललारे यांनी पदयात्रेसंदर्भात महत्वाच्या सूचना केल्या. यानंतर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष बाबा वायदंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मा.नगराध्यक्ष संजय फंड, जि. प.चे माजी सभापती बाबासाहेब दिघे, मा. नगरसेवक श्रीनिवास बिहानी, दिलीप नागरे, रितेश रोटे, मनोज लबडे, सुहास परदेशी, सुभाष तोरणे, केसी शेळके, अरुण मंडलिक, मुरली राऊत, भास्करराव लिफ्टे, प्रमोद भोसले, मीननाथ खडके, द्वारकानाथ बडधे, विठ्ठलराव गागरे, सोपानराव औताडे, किशोर छल्लारे, खंडेराव सदाफळ, बाळासाहेब इंगळे, मनसुख फरगडे, राजेंद्र तोरणे , प्रवीण नवले, रमजान शहा, अविनाश काळे, जाफर शहा, रावसाहेब आल्हाट, सरवरअली मास्टर, सरबजीत सिंग चूग, सुरेश ठुबे, संतोष परदेशी, संजय साळवे, प्रशांत राऊत, सरपंच भारत तुपे, सोपान औताडे ,शाहिद कुरेशी, सुनील जगताप,जावेद शेख, रितेश एडके, भैया भाई अख्तार, सुनील साबळे, साईप्रकाश जगधने, रियाज पठाण, संजय गोसावी, अमोल नाईक, कार्लस साठे, रामभाऊ वमने, प्रशांत राऊत, बाळासाहेब पडोळे, निलेश बनकर, संजय वारुळे, रवींद्र झरेकर, प्रताप कवडे, आबासाहेब माळी, बाबासाहेब गायकवाड, वामन जाधव, अनिल खरात, भाऊसाहेब बनकर, अतुल खरात, रावसाहेब तांबे, बाबासाहेब डांगे, योगेश उंडे, भाऊसाहेब भोंडगे, शिवाजी भागदंड, दत्तात्रय गुळवे, राजेंद्र रजपूत, उत्तम पुंड, रणजीत बोडखे, दिनकर सदाफळ, अनिल ढोकचौळे, रवींद्र गायकवाड, उत्तमराव बोर्डे, गणेश गायधने, प्रकाश थोरात, बाळासाहेब थोरात, कुंदनसिंग जुनी, गोपाल भोसले, नवाज शेख, प्रशांत उचित, शाहरुख शेख, निलेश बोरावके, कल्पेश पाटणी, अजय धाकतोडे, तीर्थराज नवले, श्रेयस रोटे, प्रशांत आल्हाट आदी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.