श्रीरामपूर : श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शोषितांचा आक्रोश शब्दांतून मांडणारे थोर समाजसुधारक, लेखक, कवी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व भारतीय असंतोषाचे जनक, महान स्वातंत्र्य सेनानी, पत्रकार व समाज सुधारक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मा. उपनगराध्यक्ष, नामको बँक व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, मा. नगराध्यक्ष संजय फंड , साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले, मा.नगरसेवक दिलीप नागरे, सुभाष तोरणे, केसी शेळके, अरुण मंडलिक, श्याम आडांगळे, सरवरअली मास्टर, रावसाहेब आल्हाट, सरबजीतसिंग चूग, पुंडलिक खरे, अशोक जगधने, पत्रकार श्री. भांड, बाबा वायदंडे, युनुस पटेल, रितेश एडके, सुरेश ठुबे, राहुल बागुल, संजय गोसावी, रियाज खान पठाण, सनी मंडलिक, प्रसाद चौधरी, तेजस बोरावके, जाफर शहा, डॉ.राजेंद्र लोंढे, साईप्रकाश जगधने, पास्टर अमोलिक, संजय साळवे, वैभव पंडित, प्रताप देवरे, गणेश काते, राजेश जोंधळे, सुरेश बनसोडे उपस्थित होते.