लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे स्फूर्तीगीतांमधून समाज प्रबोधनाचे काम, तर लोकमान्य टिळक यांचे कार्य नवीन पिढीला प्रेरणादायी; माजी आ.मुरकुटे


श्रीरामपूर : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून, कथांमधून तसेच पोवाडे व  स्फूर्तीगीतांमधून समाज प्रबोधनाचे काम केले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी शाहीर अमर शेख यांच्या जोडीने लोकजागृतिचे मोठे कार्य केले. त्यांच्या साहित्याचा अभ्यासकांनी अभ्यास करुन समाज प्रबोधनाचे काम करीत त्यांचे कार्य पुढे नेणे हेच त्यांचे खरे स्मरण ठरेल. तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे सुद्धा भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रणेते व कडवे देशभक्त होते. त्यांच्या प्रेरणेतून हजारो स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्याच्या लढ्यात उतरले आणि स्वातंत्र्य मिळवून दिले. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचे कार्य नवीन पिढीला प्रेरणादायी ठरणारे असल्याचे प्रतिपादन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.

श्रीरामपूर येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त श्री.मुरकुटे यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच लोकमान्य टिळक यांचे १०२ व्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. श्री.मुरकुटे पुढे म्हणाले की, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हे कोणत्याही एका समाजाचे नव्हते तर ते महाराष्ट्रातील समस्त समाजाचा सामाजिक व साहित्यिक ठेवा आहे. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीसह डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दलित चळवळीमध्येही मोठे योगदान दिले. त्यांनी ३५ कादंबर्‍या व १५ कथा लिहिल्या. ‘फकिरा’ सारख्या कादंबरीतून त्यांनी वंचितांच्या वेदना समाजासमोर मांडल्या. या कादंबरीला महाराष्ट्र सरकारने साहित्यरत्न पुरस्कार देवून सन्मानित केले, असे ते म्हणाले.


याप्रसंगी माजी आ.भाऊसाहेब कांबळे, मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, लोकसेवा विकास आघाडीचे शहराध्यक्ष नाना पाटील, कॉ.पांडूरंग शिंदे, माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब मुळे, शिवसेनेचे सचिन बडदे, पत्रकार मिलींदकुमार साळवे, अ‍ॅड्.तुषार चौदंते, कारेगाव भाग कंपनीचे संचालक भगवान सोनवणे, संजय लबडे, शेतकरी सेवा केंद्राचे अमोल कोलते, आण्णाभाऊ साठे जयंती एकता समितीचे अध्यक्ष सुधाकर ससाणे, उपाध्यक्ष पंडीत जाधव, किशोर फाजगे, विजय शेलार, पुंडलीक खरे, अनिल कुलकर्णी, बाळासाहेब गोराणे, विशाल धनवटे, निखिल पवार, भागचंद नवगिरे, जयेश परमार, प्रदीप जाधव, यासीन सय्यद, अंबादास पवार, प्रमोद करंडे, संजय मोरगे, बाळासाहेब मोरगे आदी उपस्थित होते.


अशोक साखर कारखाना कार्यस्थळावर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अशोक उद्योग समुहाच्या वतीने अभिवादन केले. याप्रसंगी कार्यकारी संचालक संतोष देवकर, कार्यालय अधिक्षक विक्रांत भागवत, बाबासाहेब तांबे, विलास लबडे, बाळासाहेब मेकडे आदी उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post