श्रीरामपूर : स्व.लोकनेते जयंतराव ससाणे यांनी श्रीरामपूर शहरात व तालुक्यात काँग्रेस विचारसरणी रुजवली असुन माझं गाव माझी शाखा या अभीयानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकांना काँग्रेस विचारधारेशी जोडणार आहोत असे प्रतिपादन प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस सौ दीपाली करण ससाणे यांनी केले आहे.
सदर अभियान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ गट नेते,माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी मा. कृष्णा अल्लवारुजी आणि युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. बी.वी. श्रीनिवासजी, महाराष्ट्र युवक काँग्रेस चे प्रभारी मा.मितेंद्र सिंग व वंदना बेन ,प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे,प्रदेश युवक काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यभर राबविले जात आहे. आज श्रीरामपुर विधानसभा क्षेत्रातील जिजामाता चौक येथे 'माझे गांव - माझी शाखा' उपक्रमा अंतर्गत शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष ,जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, मा.नगरसेवक आशिष धनवटे, सुभाष तोरणे,सुहास परदेशी, युनुस पटेल, नवनियुक्त शाखा अध्यक्ष कल्पेश पाटणी,उपाध्यक्ष अनिता हरार,महासचिव प्रणव शिंदे,अथर्व नागरे,योगेश ढसाळ,सचिव ओम कु-हे, संजय गोसावी, विजय छल्लारे, राहुल शिंपी,सुनील साबळे, साई प्रकाश जगधने, गोपाल भोसले, सुरेश ठुबे, तीर्थराज नवले, प्रशांत आल्हाट,, जियान पठाण, रोहित भांबारे, सुरेश बनसोडे व युवक काँग्रेस सहकारी उपस्थित होते.