अशोक कारखाना कार्यस्थळावर शैक्षणिक संकुलाच्या वतीने विद्याथ्यांची 'तिरंगा फेरी'


श्रीरामपूर - अशोक कारखाना कार्यस्थळावरील अशोक शैक्षणिक संकुलाच्या वतीने स्वातंञ्याच्या अमृत महोत्सव निमित्त  'हर घर तिरंगा अभियान' अंतर्गत कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली अशोक शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांची सवाद्य 'तिरंगा फेरी' काढण्यात आली. सदर अभिनव उपक्रमास उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

     देशभरात स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबविले जात आहेत. यात प्रामुख्याने 'हर घर तिरंगा' अभियानाचा समावेश आहे. या आभियान अंतर्गत आज अशोक कनिष्ठ व वरिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यलयाच्या वतीने विद्यार्थ्यांची सवाद्य तिरंगा फेरीचे आयोजन करण्यात आले होते. 
     महाविद्यालयाच्या प्रांगणात या फेरीचा संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्री मुरकुटे, माजी चेअरमन सोपानराव राऊत, संस्थेचे उपाध्यक्ष योगेश विटनोर, सहसचिव भास्कर खंडागळे, उपप्राचार्य प्रा.सुनिताताई गायकवाड आदींच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. त्यानंतर कारखाना कार्यस्थळावर सवाद्य तिरंगा फेरी काढण्यात आली. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, हर घर तिरंगा आदि घोषणांनी वातावरण चैतन्यमय बनले होते.
     सदर फेरीत शैक्षणिक संकुलातील महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच कर्मचारी सहभागी झाले होते. शनिवार (ता.१३) रोजी सकाळी साडे आठ वाजता कारखाना व्यस्थापनाच्या वतीने कार्यालये, शैक्षणिक संस्थांच्या इमारती, अधिकारी तसेच कर्मचा-यांच्या वसाहतीतील घरांवर तिरंगा ध्वज फडकावून 'हर घर तिरंगा अभियान' तसेच 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' उत्साहात साजरा केला जाणार आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post