श्रीरामपूर - संत सावता माळी यांनी आपल्या मळ्यात विठ्ठल शोधला आणि भक्तीचा मार्ग दाखविताना श्रमाला दैवत्व मिळवून दिले. तर भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम यांनी विज्ञानाव्दारे मानवता दर्शविताना भारताला अण्वस्ञसज्ज व आत्मनिर्भर बनविले, असे प्रतिपादन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.
लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने संत सावता माळी यांची तसेच माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी श्री मुरकुटे म्हणाले की, संत सावता माळी यांनी आपल्या शेतातच विठ्ठल शोधला. शेतातच माझे विठ्ठल रखुमाई आहेत, असे ते सांगत. यातून त्यांनी श्रम आणि कष्टातच देव आहे असा महामंञ दिला. तर देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.कलाम यांनी निर्भय व अण्वस्ञसज्ज भारत बनविण्यासाठी आयुष्य वेचले. मिसाईलमॅन म्हणून त्यांची ओळख असली तरी त्यांनी विज्ञानाला मानवतेची जोड दिली होती.साधी राहाणी उच्च विचारसरणीचे ते प्रतिक होते तसेच ते सच्चे देशभक्त होते, असे श्री.मुरकुटे म्हणाले.
यावेळी लोकसेवा विकास आघाडीचे शहराध्यक्ष नाना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सदर प्रसंगी मार्केट कमिटीचे माजी संचालक रमेश सोनवणे, अशोक कारखान्याचे संचालक आदिनाथ झुराळे, लोकसेवा विकास आघाडीचे कोषाध्यक्ष गणेश सिंग, शेतकरी सेवा केंद्राचे श्रीधर कोलते, अॅड्.पृथ्वीराज चव्हाण, खादी ग्रामोद्योग संघाचे माजी व्हा.चेअरमन प्रविण फरगडे, विशाल धनवटे, अंबादास पवार, प्रमोद करंडे,अंबादास पवार, संजय मोरगे, सोहम मुळे आदी उपस्थित होते.