क्षयरोग रुग्णांनी नियमित औषधे व उत्तम आहार घेतल्यास क्षयरोग नक्कीच बरा होईल ; सौ. मीनाताई जगधने



श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी,जिल्हा क्षयरोग केंद्र नगर,तालुका आरोग्याधिकारी कार्यालय श्रीरामपूर,उपजिल्हा रुग्णालय,नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नगरपरिषद श्रीरामपूर आदींच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील संशयित क्षयरोग रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले होते त्यात २०७ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून २५० क्षयरोग रुग्णांना मोफत पौष्टिक खाद्य किट वितरीत करण्यात आले.


कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेविका रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या व श्रीरामपूर रयत संकुलाच्या चेअरमन सौ.मीनाताई जगधने यांच्या शुभहस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून रेड क्रॉस चेअरमन तथा प्रांताधिकारी अनिल पवार,व्हाईस चेअरमन तथा तहसीलदार प्रशांत पाटील, श्रीरामपूर न.पा. मुख्याधिकारी गणेश शिंदे,पोलीस निरीक्षक संजय सानप अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी भागवत दहिफळे,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अविनाश आहेर, तालुका आरोग्याधिकारी डॉ. राजश्री देशमुख,जिल्हा वैद्यकीय पर्यवेक्षक माधव राठोड, आरोग्याधिकारी डॉ.जया छतवानी,डॉ.संकेत मुंदडा,डॉ. शाम बोरुडे,डॉ.आर जे. धापटे, डॉ.सुनील राजगुरू,तालुका पर्यवेक्षक प्रकाश मेटकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ शबाना खान, धनिष्ठा पागिरे,विनोद वाणी, डॉ.वैरागड,सेंट लूक रुग्णालयाच्या व्यवस्थापिका सिस्टर जांसिया, कानोसा कॉन्व्हेन्ट व्यवस्थापक सिस्टर लुसिया आदी मान्यवर उपस्थित होते. रेड क्रॉस सचिव सुनील साळवे यांनी उपस्थितांचे स्वागत करून रेड क्रॉस सोसायटी वाटचाल विशद केली. सौ. मीनाताई जगधने यांनी रेड क्रॉस कार्याचे कौतुक करून समाजाला आवश्यक असणारी सर्व क्षेत्रातील कामे ही संस्था करत आहे .क्षयरोग रुग्णांनी नियमित औषधे व उत्तम आहार घेतल्यास क्षयरोग नक्कीच बरा होईल.असे मीनाताई जगधने यांनी नमूद केले.


जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत दहिफळे यांनी जिल्ह्यातील क्षयरोगाची आकडेवारी विशद करताना २०२४ पर्यंत नगर जिल्हा क्षयरोग मुक्त करण्याचा संकल्प असल्याचे सांगताना यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे आवाहन केले.रेड क्रॉस चेअरमन तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांनी मनोगत व्यक्त करताना श्रीरामपूर रेड क्रॉस ने अल्पावधित सुंदर काम करून राज्यात वेगळी ओळख निर्माण केली.त्याचाच परिणाम म्हणून अद्यावत रुग्णवाहिका गिफ्ट मिळाली ते २०२२ चा उत्कृष्ट शाखा अवॉर्ड साठी निवड झाली आहे,रेड क्रॉस जगात नेहमीच गरजुं चे मागे आहे तसेच मानवी सुरक्षा,शांतता, संकट काळात मदत ,आरोग्यसेवा ही रेड क्रॉस ची उल्लेखनीय कार्य आहेत.अहमदनगर जिल्हा क्षयरोग निर्मूलनासाठी रेड क्रॉस योगदान देतील असे सांगत रेड क्रॉस चे सर्व पदाधिकारी व सभासदांचे कौतुक केले. तालुक्यातील २५० क्षयरोग (टी. बी) रुग्णांना पौष्टिक कीट चे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.शेवटीआभार संजय दूशिंग यांनी मानले.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेअरमन प्रांताधिकारी अनिल पवार,व्हाइस चेअरमन तहसीलदार प्रशांत पाटील,सुनील साळवे,प्रवीण साळवे,पोपटराव शेळके,श्रावण भोसले,विश्वास भोसले,सुरेश वाघुले,प्रेमनाथ सोनुने,नानासाहेब मुठे,कांतीलाल शिंदे,किरण सोनवणे,बाळासाहेब जोशी,मयूर पळघडमल,भरत कुंकुळोल,शोभा शेंडगे,सविता साळुंके,डॉ.संजय दुशिग,सुखदेव शेरे,आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post