येथील कुरेशी जमात ट्रस्टच्या वतीने समाजातील गरजू मुलींना शिवणकामाचे प्रशिक्षण देऊन शिलाई मशीनचे वाटप तसेच समाजातील मुला-मुलींनी उच्च शिक्षण प्राप्त केल्या बद्दल गुणवंतांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कानडे बोलत होते अध्यक्षस्थानी कुरेशी समाजाचे ज्येष्ठ सल्लागार अब्दुलकरीम लालमिया चौधरी हे होते.
या प्रसंगी नेव्ही मध्ये निवड झाल्याबद्दल साहिल शकील कुरेशी यांचा तसेच डी.फार्मसी ची पदवी संपादन केल्याबद्दल कुमारी समीना उस्मान कुरेशी या दोघांचा सत्कार करण्यात आला,तसेच कुरेशी समाजातील गुणवंत पंधरा मुलींना शिवण काम व मेहंदीचे प्रशिक्षण देऊन त्यापैकी पाच गरजू मुलींना कुरेशी जमातच्या वतीने शिलाई मशीनचे मोफत वाटप करण्यात आले. दहावी बारावी मध्ये समाजातील मुला-मुलींनी यश संपादन केल्याबद्दल अशा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र व मिठाई देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुफ्ती मोहमद रिझवानुलहसन, आमदार लहुजी कानडे यांचे बंधू अशोकराव कानडे, वेस्टन कंपनीचे मालक हाजी अंजुमभाई शेख, माजी नगरसेविका सौ. समीना अंजुम शेख, जायदाबी कुरेशी, नजीरभाई मुलानी, जलील काजी, फारुख इसहाक कुरेशी, रमजान शहा, ऍड. समिन बागवान, अरुण पाटील नाईक, अकीलभाई शेख, खॉजाभाई कुरेशी ममदापूरवाले, साजिद मिर्झा, याकूबभाई कुरेशी, सोहेल दारूवाला, तौफिक शेख, आदिल मखदुमी, युनूसभाई पिंजारी, मुस्ताक तांबोळी आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मुफ्ती मोहमद रिजवान यांनी कुरेशी जमातच्या वतीने आज पर्यंत केलेल्या शैक्षणिक, धार्मिक, समाजातील गरीब, होतकरू लोकांसाठी राबविण्यात आलेल्या योजना व कामाबद्दल कुरेशी जमातच्या कामाचे कौतुक केले.
नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष हाजी अंजुमभाई शेख म्हणाले की माझ्या राजकीय जीवनामध्ये कुरेशी जमातने आज पर्यंत मला मोलाचे सहकार्य करून नेहमी चांगले कामाचे दर्शन घडविले. सामुदायिक विवाह सारख्या एक अतिशय आदर्श कार्य करून इतर समाजातील घटकांना एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला. समाजाने आज पर्यंत केलेल्या सहकार्य केल्याबद्दल कुरेशी समाज व जमात यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी कुरेशी समाजाचे अध्यक्ष मेहबूबभाई कुरेशी यांनी आलेल्या सर्वांचे स्वागत करून आजपर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेऊन सामुदायिक विवाह, मुलींचे धार्मिक शिक्षण, मुलींचे शिलाई प्रशिक्षण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व समाजाच्या वेगवेगळ्या समस्या व समाजाने केलेल्या कार्याबद्दल सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. समाजामध्ये वाढदिवस साजरे करण्याचे फॅड वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक कलीम रमजान कुरेशी, कय्युम कुरेशी, हारून कुरेशी सर, शकील चौधरी, अक्रम कुरेशी, युनुस बाबा कुरेशी, जफर कुरेशी, हारून सत्तार कुरेशी, सादिक कुरेशी, कलीम नुरा, ख्वाजामिया कुरेशी इत्यादींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रज्जाक पठाण यांनी केले तर आभार हारून कुरेशी सर यांनी मानले.