श्रीरामपूर : अशोक कारखाना संलग्न अॕग्रो इंडस्ट्रीज एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट फौंडेशन अंतर्गतच्या अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालिल अशोक आयडीअल स्कूलचा सी.बी.एस.इ.बोर्डाच्या नुकत्याच जाहिर झालेल्या दहावीच्या (सी.बी.एस.ई.)बोर्डाच्या परिक्षेत शंभर टक्के निकाल लागल्याची माहिती कारखान्याच्या तज्ञ संचालिका तथा स्कूलच्या कार्यकारी अधिकारी मंजुश्री मुरकुटे यांनी दिली.
सी.बी.एस.ई बोर्डाचा दहावीचा निकाल नुकताच जाहिर झाला. यात अशोक आयडीअल स्कूलचे सर्वच्या सर्व १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.त्यात प्रथम क्रमांक कु.रचना शिंदे (९२.४%)द्वितीय क्रमांक कु.राजेश्वरी जाधव(८८.४%) तृतीय क्रमांक कु.सृष्टी येसेकर (८८.२%)यांनी मिळवला. सन २0१३ मध्ये स्थापन झालेल्या या स्कूलमध्ये प्री प्रायमरी ते दहावी पर्यन्त ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षण सुविधा यामुळेच स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळविल्याचे मंजुश्री मुरकुटे यांनी सांगीतले.
सदरच्या यशाबद्दल अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आं.भानुदास मुरकुटे, व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे,फौंडेशनचे अध्यक्ष सोपानराव राउत,उपाध्यक्ष बाबासाहेब आदिक,सचिव विरेश गलांडे,अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे,उपाध्यक्ष योगेश विटनोर,सहसचिव भास्कर खंडागळे,मुळा-प्रवरा वीज संस्थेचे संचालक सिध्दार्थ मुरकुटे, स्कूलच्या कार्यकारी अधिकारी मंजुश्री मुरकुटे,अशोक महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा.सुनिता गायकवाड,अशोक आयडीयल स्कूलचे प्राचार्य रईस शेख,अशोक इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य संपतराव देसाई तसेच अध्यापक वर्ग आदिंनी अभिनंदन केले आहे