श्रीरामपूर : महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांना रोजगार उपलब्ध करून, स्वतःच्या पायावर उभे करणार असल्याचे मत मा उपनगराध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनी व्यक्त केले आहे.
बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी उभ्या केलेल्या छोट्याशा व्यवसायातून त्यांच्या कुटुंबाला मोठा हातभार लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले. आज श्री शक्ती ग्रुप व जिल्हा बँक अहमदनगर, श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटी यांच्या सहकार्याने सहाव्या टप्प्यातील कार्यक्रमात चार जे एल जी महिला बचत गटांना चार लाख रुपये कर्ज देण्यात आले. याप्रसंगी ससाणे बोलत होते. श्री शक्ती ग्रुप व जिल्हा बँकेच्या वतीने आतापर्यंत ७९ बचत गटांना ७९ लाख रुपयांची वाटप करण्यात आलेले आहे. यानंतर साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर म्हणाले , स्वर्गीय ससाणे साहेबांचा जन विकासाचा संकल्प करण व दिपाली ससाणे यांनी हाती घेतलेला असून महिला बचत गटाच्या माध्यमातून नक्कीच सक्षम महिला घडतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सदर बचत गटाच्या कर्जवाटप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डावखर, मा नगरसेवक रितेश रोटे, मनोज लबडे, आशिष धनवटे, सुभाष तोरणे, केसी शेळके, श्याम अडांगळे, रावसाहेब आल्हाट, सरबजीतसिंग चूग, प्रवीण नवले, जाफर शहा, पुंडलिक खरे, जावेद शेख, सुरेश ठुबे, प्रसाद चौधरी, बाबा वायदंडे, युनुस पटेल, मुरली राऊत, रियाज खान पठाण, संजय गोसावी, रितेश एडके, संतोष परदेशी, राहुल शिंपी, लक्ष्मण शिंदे, साईप्रकाश जगधने, कुंदन सिंग, अजय धाकतोडे, शाहरुख पटेल, अमोल चिंतामणी, अहमदनगर जिल्हा बँकेचे टी डी ओ पवार साहेब, अशोक पटारे, चव्हाण मॅडम, शेलार मॅडम उपस्थित होते.