श्रीरामपूर : शिवसेनेचे पक्षप्रमुख तसेच माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व जनता आणि शिवसैनिकांना आवाहन केले की मला भूल बुके फ्लेक्स नको परंतु जास्तीत जास्त प्रतिज्ञापत्र आणि शिवसैनिक ची नोंदणी करा हेच माझ्यासाठी भेट आहे. त्या आव्हानाला साथ देत आज श्रीरामपूर शिवसेनेतर्फे शिवसेना सभासद नोंदणी शिवसेना संपर्क कार्यालय या ठिकाणी चालू करण्यात आली आहे अशी माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे यांनी दिली.
यावेळी शहर प्रमुख सचिन बडदे यांनी म्हणाले, साधारण दोनशेच्या आसपास प्रतिज्ञापत्र यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली आहे. श्रीरामपूर शहरांमध्ये कमीत कमी पाच हजार लोकांची शिवसेना सभासद नोंदणी लवकरच पूर्ण करण्यात येईल. लवकरच प्रत्येक भागामध्ये या नोंदणीची जोरात सुरुवात करणार होईल.
यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे, वाहतूक सेना शहर संघटक यासीन सय्यद, उपशहरप्रमुख रोहित भोसले, शहर कार्याध्यक्ष राहुल रणधीर, विभाग प्रमुख रमेश घुले, विभाग प्रमुख किशोर फासगे, युवा सेना शहर प्रमुख निखील पवार, महिला जिल्हा संघटक शारदाताई कदम, उमेश अल्हाट, राहुल डूकरे, रोहित डूकरे, गौरव कदम, हेमंत मुसमाडे, रोहित देवरे,अषिश त्रिभुवन,अर्यण गुळवे पाटील, संकेत शिंदे,सत्यजित विळसकर, प्रतिक यादव या प्रमुख लोकांनी सभासद नोंदणी करून या उपक्रमाची सुरुवात केली.