एसपी साहेब.....श्रीरामपुरात चाललंय काय...! श्रीरामपुरात चौका-चौकात मटका बुकी, गावठी दारू गुत्ते, तोता-मैना, टपऱ्या-टपऱ्यात गुटखा ; पोलीस प्रशासन करतंय काय : 'समाजवादी'चे एसपी'ना निवेदन


श्रीरामपूर : श्रीरामपूर शहर आणि तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात अवैध व्यावसाय चालु असून यामुळे गुन्हेगारांची दहशत निर्माण झालेली असल्याने सर्वसामान्य नागरीक दहशत आणि भीतीच्या सावटाखाली आपले जीवन जगत असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालुन अवैध व्यावसाय बंद करुन या प्रश्नी जनसामान्यांना न्याय द्यावा, असे समाजवादी पक्षाचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी जिल्हा पोलिस प्रमुख यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.


                या निवेदनात असे म्हटले आहे की,सध्या श्रीरामपूर शहरासह तालुकाभरात अवैध व्यावसाय पत्याचे क्लब गावठी दारु विक्री, मटका, सोरट, तीन पत्यांचा खेळ,(तोता मैना) अनधिकृत ऑनलाईन लॉटरी (ऑनलाइन मटका ) अशी अवैध व्यावसाय खुले आमपणे चालु आहे. यामुळे समाजात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून जुगारी व दारुच्या व्यसनाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, तर आपली नशा भागविण्यासाठी गंजाडी हे भुरट्या चोऱ्या करून आपली नशा पूर्ण करतात. त्यामुळे गुन्हेगारीही वाढत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्रीस बंदी असताना देखील गुटखा तर सर्रासपणे काही दुकानात विकला जात असल्याचे दिसून येत आहे,जेव्हा इतक्या प्रचंड प्रमाणात गुटखा विक्री होत आहे तर मग सहाजिकच त्याचे होलसेल विक्री करणारे किती असतील याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे,गुटखा होलसेल विक्री करणारे गुटखा विक्रेते गुटख्याचा माल शहर व तालुक्यात आणत असतील ?, याची संबधित पोलिसांना माहिती नसावी ही मोठी खेदाची बाब आहे,ज्यावर पोलिसांचं नियंत्रण असावे त्या पोलिसांशीच जणू या अवैध व्यावसायिकांची अप्रयक्ष हातमिळवणी झाली असल्याचा संशय देखील बळावत असल्याने तालुकाभरात अवैध व्यावसायांना उत आल्याचे दिसून येत आहे. शहरात राजरोसपणे गल्ली बोळात खुले आमपणे मटका बुकी मटका घेताना दृष्टीपथास येत असुन काही पान टपऱ्या आणि किराणा दुकानात गुटख्याची खुलेआमपणे विक्री केली जात आहे,शहरात चोरीच्या घटनाही प्रचंड प्रमाणात वाढल्या असुन गुंडगीरीला देखील मोठे उधाण आल्याचे दिसून येत आहे, भांडणे,मारामाऱ्या हे तर नित्याचेच होऊन बसले असुन पोलिसांचा जरासाही धाक,जरब गुन्हेगारांवर राहिला नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.


          सर्व सामान्यांना त्रास तर गुन्हेगारांना अभय अशी स्थिती शहर आणि तालुकाभर झाली असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे शहरातील नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे, अवैध धंदे,दहशत,भांडणे मारामाऱ्या ,चौका चौकात मटका बुक्की अड्डे यामुळे महिला, मुली व विद्यार्थिनींना रस्त्याने जाणे  येणे मुश्कील झालेले आहे, नशेबाज व गंजाडी लोकांकडून महिलांची छेडछाड हे नित्यनियमाचे झाले आहे, मात्र नको इभ्रतीचा पंचनामा म्हणून कोणतीही महिला किंवा गृहिणी  पोलिसांकडे तक्रार देण्यास जात नाही याचा फायदा या गुंडांनी घेतलेला आहे. असे सर्वकाही चालू असताना मग श्रीरामपूर शहर आणि तालुका पोलिस नेमके करतात तरी काय ? असा प्रश्न जनसामान्यांच्या पुढे उभा रहात आहे,ज्या पोलिस स्टेशनच्या कार्येक्षेत्रात अवैध व्यावसाय त्या पोलिस स्टेशनचा प्रमुख दोषी ठरवला जाईल या आपल्या आदेशाला या ठिकाणी हरताळ फासले जात आहे, म्हणून आपण जातीने लक्ष घालून श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील अवैध व्यवसायांना पायबंद घालुन सदरील व्यावसायिकांवर कारवाई करत हे अवैध व्यावसाय कायमचे बंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा

१) श्रीरामपूर शहर व तालुक्यातील कायद्यानुसार  अवैध समजले जाणारे सर्वच अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे 

२) अवैध व्यवसाय करणा-या प्रत्येक इसमाचा गुन्हेगारीशी काहीच संबंध आहे काय याची सखोल चौकशी करून कारवाई करावी,

३) शहरात व तालुक्यात अवैद्यरीत्या विकला जाणारा गुटखा कोणत्या ठिकाणाहून आणण्यात येतो व कुठे साठविण्यात येतो या गोडाऊनची सखोल चौकशी करून सर्व गोडाऊन्स कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, 

४) श्रीरामपूर शहर व तालुक्यात सुरू असलेल्या अवैध ऑनलाईन लॉटरी (ऑनलाइन मटका) कायमस्वरूपी बंद करण्यात यावा,

५)श्रीरामपूर शहर व तालुक्यात होणारी गावठी दारूची अवैध मद्यविक्री ,गांजाविक्री इत्यादी त्वरित बंद करण्यात यावे   

६) श्रीरामपूर शहराच्या रस्त्यांवर चौका चौकात खुलेआम सुरू असलेले सट्टा बुक्की (मटका बेटिंग)  त्वरित बंद करण्यात यावे 

याचबरोबर कायद्यानुसार समजले जाणारे सर्व अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्यात यावे 

येत्या १५ दिवसांत यावर जर कोणतीच कारवाई झाली नाही तर नाविलाजास्तव येत्या २२ मार्च २०२२ पासुन आम्ही सर्व कार्यकर्ते आणि इतर सामाजिक संघटना उपोषणाचा मार्ग स्विकारु व यापासून उद्भवलेल्या बऱ्या वा वाईट परिणामास संबंधित पोलिस प्रशासनच जबाबदार राहील असेही या निवेदनात शेवटी म्हटले आहे, सदरील निवेदनाच्या प्रती गृहमंत्री,पोलिस महासंचालक, पोलिस उपमहानिरीक्षक, जिल्हाधिकारी,अप्पर पोलिस अधीक्षक,डीवायएसपी,पी.आय. श्रीरामपूर शहर व तालुका आणि अन्न भेसळ प्रतिबंधक विभाग आदींना पाठविण्यात आल्या आहेत.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post