'भीमगर्जना' संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेमुळे भारत देश लोकतंत्र आहे. त्यांचे या भारत देशावर मोठे उपकार आहे. ज्या देशात आपल्याला स्वातंत्र्य, बंधुता, समता व लोकशाही मार्गाने ज्या महापुरुषामुळे राहण्याची वावरण्याची संधी मिळाली, अशा महापुरुषांची विटंबना होणे अत्यंत निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून शासन करावे. अशी मागणी करून भिम गर्जना संघटनेच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी उपस्थित संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोजभाई पठाण, महाराष्ट्र अध्यक्ष शिवाभाऊ साठे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष कांगणे पाटील, अहमदनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अकबर शेख, श्रीरामपुर तालुकाध्यक्ष रफीक शहा, श्रीरामपूर तालुका युवा अध्यक्ष अतिक शेख, शहर युवा अध्यक्ष रफिक पठाण, शहर संपर्क प्रमुख सचिन बनकर, बाळासाहेब गुडेकर, मुबारक शेख, बुराभाऊ धीवर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.