नगर जिल्ह्यात 'मनसे' स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्व निवडणुका पूर्ण ताकतीने लढविणार : मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे


श्रीरामपूर : नगर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्व निवडणुका 'मनसे' पूर्ण ताकतीने लढून आपली ताकद दाखवून देणार असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले.

       मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर तालुक्यामध्ये शासकीय विश्रामगृह येथे मनसेच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली होती. याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले, राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने व पक्षाचे नेते बाळा नांदगावकर साहेब यांच्या सूचनेने नगर जिल्हा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात जाऊन आढावा बैठक घेण्याचे काम आम्ही चालू केली आहे प्रत्येक तालुक्यात जाऊन सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची अडीअडचणी जाणून घेऊन व येत्या स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये मोठ्या ताकतीने पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढवावी यासाठी मार्गदर्शन करण्याचे काम जिल्ह्यातील आम्ही तिन्ही जिल्हाध्यक्ष करत आहोत.


          श्रीरामपूर तालुक्यामध्ये पक्ष स्थापनेपासून आम्ही काम करत असताना अनेक अडचणींना सामोरे गेलो व अनेकांबरोबर वाद-विवाद झाले आणि काहीं बरोबर तर दुश्मनी देखील झाले तरीही आम्ही कोणालाही न घाबरता पक्षाचे काम जोमाने करत आहोत प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याच्या सुखात दुखात आम्ही सहभाग घेत असतो व कुठल्याही गटात घाटाला कधीच आम्ही थारा दिलेला नाही म्हणूनच श्रीरामपूर मध्ये मोठे संघटन तयार झाले आहे तसेच प्रत्येक निवडणुकीत आपले उमेदवार उभे करून निवडणूक लढलो परंतु पराभवाला सामोरे जावे लागले तरी न करता आम्ही काम करत राहिलो नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका मध्ये काही ग्रामपंचायत मध्ये उमेदवार निवडून आले ग्रामपंचायतीमध्ये आपली सत्ता आली राज ठाकरे साहेब यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या ठिकाणी आम्ही केले लोकांच्या सर्व अडचणी सोडवण्याचे सातत्याने प्रयत्न करत असतो विविध विषय घेऊन  रास्ता रोको मोर्चे अशा विविध प्रकारचे आंदोलने केलेली आहे व हिंदूंच्या रक्षणासाठी आम्ही रात्रंदिवस काम करत असतो व लव जीयाद च्या विरोधात सातत्याने आवाज उठवण्याचे काम आम्ही केलेले आहे या पुढे करत राहणार राज साहेब ठाकरे यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोचून पक्ष वाडीचे सातत्याने काम आम्ही करत आहोत असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे याप्रसंगी म्हणाले या आढावा बैठकी च्या अध्यक्ष स्थान नगर जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ हे होते तर दक्षिण जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती या दोघांनी उपस्थित असलेल्या श्रीरामपूर आतील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करून पक्ष संघटन कसे वाढवावे येत्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने तयारी करून सर्व निवडणुकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी काम करावे याचे मार्गदर्शन केले व कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये आपले उमेदवार निवडूनच आले पाहिजे असे आदेश दिला व येत्या 13 तारखेला नगर येथे पक्षाचे नेते बाळा नांदगावकर साहेबांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये होणाऱ्या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले.


             आढावा बैठकीचे नियोजन मनसे जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवथर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, विधानसभा अध्यक्ष संतोष डहाळे,तालुकाध्यक्ष गणेश दिवसे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष विशाल शिरसाठ, तालुकाध्यक्ष मनविसे अक्षय सूर्यवंशी कामगार सेना तालुका अध्यक्ष प्रवीण रोकडे यांनी केले होते. याप्रसंगी बबन महागडी भास्कर सरोदे दीपक सोनवणे मनोज जाधव राजू शिंदे संतोष भालेराव लखन कडवे गणेश राऊत लक्ष्मण लोखंडे अनिल शिंदे दादासाहेब बनकर रोहित जवंजाळ आकाश कापसे सचिन धोत्रे प्रवीण कारले महादेव वहाळ समर्थ सोनार संदीप विषांबर अमोल साबणे निलेश सोनवणे ईश्वर जगताप किरण रणवरे महेश कोलते लक्ष्मण लोखंडे सोमनाथ कासार रतन वर्मा निकेतन रोकडे ज्ञानेश्वर काळे अभंग चेतन दिवटे अक्षय अहिरे संतोष आवटी नितीन खरे अनिल बोरुडे दीपक लांडे अनिल शिंदे लक्ष्मण शिंदे रामदास फिलगर सुदाम गायकवाड, लखन शिंदे प्रथमेश गायकवाड सुमित गोसावी ओमकार अनाप संदीप देठे सुधीर मोठे कृष्ण पठारे गणेश पठारे नंदू भुजबळ किशोर थोरात रोहित वेताळ कुंदन वेताळ अक्षय गुजर राहुल शिंदे विकी शिंदे अतुल खरात आदी उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post