'भीमगर्जना' संघटनेने पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू आहेत. मटका, पत्त्याचे क्लब, दारू, गुटखा व इतर अनेक अवैध धंदे श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. चोऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. यावर पोलीस खाते हेतूपूरस्पर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. अवैध धंद्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. दारू, मटका मोठ्या प्रमाणावर वाढल्याने तरुण पिढी वाया जात आहे. अनेकांचे संसार धुळीस मिळत आहे. दारू गुत्यामुळे दारुड्यांचे व गुन्हेगारीचे प्रमाण तालुक्यात वाढले.
श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांत आठ दिवसाच्या वरील सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करावे व त्यांच्यावर मोक्का लावून कारवाई करावी, अन्यथा 'भीमगर्जना' संघटनेच्यावतीने आमरण उपोषण व उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी उपस्थित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पठाण, महाराष्ट्र अध्यक्ष शिवाभाऊ साठे, महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रवीण साळवे, श्रीरामपुर तालुकाध्यक्ष रफिक शहा, तालुका उपाध्यक्ष सोनू शेख, महासचिव मोहन शेख, विभाग प्रमुख बाळासाहेब गुडेकर, तालुका युवक अध्यक्ष अतिक शेख, सचिन बनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.