श्रीरामपूर : माता वैष्णवी देवी येथे जाणाऱ्या भाविकांसाठी झेलम एक्सप्रेस रेल्वे ही डायरेक्ट वैष्णो देवी कट्टरा रेल्वे स्टेशनपर्यंत घेऊन जाण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी यांनी दिली.
श्रीरामपूर बेलापूर रेल्वे स्टेशन येथून दोनशे भाविकांचा जत्था वैष्णोदेवी दर्शनासाठी रवाना झाला त्यांना त्याप्रसंगी भाविकांना शुभेच्छा देण्या प्रसंगी गुलाटी बोलत होते . गुलाटी पुढे म्हणाले की पुणे अहमदनगर मार्गे जम्मू कडे जाणारी झेलम एक्सप्रेस ही एकमेव रेल्वे जम्मू पर्यंत जाणारी रेल्वे आहे जम्मू वरून वैष्णोदेवी कटरा येथे जाण्यासाठी वेगळी रेल्वे धरून किंवा बसने बायरोडने माता वैष्णोदेवी कटरा पर्यंत जावे लागते परंतु आता जम्मू पासून अवघ्या दीड तासाच्या अंतराने डायरेक्ट वैष्णोदेवी कटरा पर्यंत रेल्वे स्टेशन झाले आहे फक्त दीड तासाच्या अंतराने पुढे झेलम घेऊन गेल्यास भाविक थेट वैष्णोदेवी येथे पोहोचणार आहे. आम्ही हा मागणीचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे सादर केला आहे.
झेलम रेल्वे गाडी कटरा रेल्वे स्टेशन पर्यंत नेण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास वैष्णोदेवीला दर्शनाची इच्छा असणाऱ्या वयोवृद्ध तसेच सर्वसामान्य भाविकांचे आणि प्रवाशांची खूप चांगली सुविधा निर्माण होणार आहे म्हणून झेलम रेल्वे गाडी कटरा वैष्णोदेवी रेल्वे स्टेशनपर्यंत घेऊन जाण्याची मागणी भाविकांच्या वतीने रेल्वे मंत्री नामदार रावसाहेब दानवे खासदार सदाशिव लोखंडे खासदार सुजय दादा विखे श्रीरामपूर येथील प्रवासी संघटनेचे श्री रणजीत श्रीगोड व रेल्वे मंत्रालयाकडे करण्यात आली असल्याचे सांगितले.
जय मातादी मित्र मंडळ दरवर्षी एक हजारापेक्षा जास्त भाविकांचा जथा वैष्णोदेवी दर्शनासाठी नियोजन बद घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असतो 370 कलम रद्द झाल्यानंतर तेथे भाविकांना सोयी-सुविधा व राहण्यासाठी महाराष्ट्र भवन आश्रमाची जागेची मागणी जम्मू सरकारकडे केलेली होती. करोना कालखंडामध्ये सदर प्रस्ताव रखडला असून पुन्हा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नगरसेवक राजेश अलघ यांनी सांगितले.
याप्रसंगी सर्वश्री श्री नानासाहेब जाधव जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,बंटी थापर, श्री प्रशांत अलघ ,भरत कुमार, धीरज गुजर, श्री रणजीत श्रीगोड, सुवालालजी लुक्कड, रवींद्र कोळपकर, कोंडीराम जाधव, गोविंद शेठ दायमा, राजेंद्रजी शर्मा,वल्लभजी दायमा, भरत शेठ सोमानी, शरद शेठ सोमानी काशिनाथ काळे विष्णू खंडेलवाल भूषण साठे देविदास चव्हाण केशव आवटी प्रमोद बोरा आदी सर्व भाविकांना शुभेच्छा देण्यात आल्या.