श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : त्रिदल सैनिक सेवा संघाच्या वतीने आजी-माजी सैनिकांच्या विविध प्रश्न, समस्यांबाबत येत्या रविवारी (दि.२७) शहरात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महासंघाचे उत्तर विभागाचे उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
बहुतांश माजी सैनिकांचे प्रश्न प्रलंबितच असल्याने ते सर्व प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यात येणार आहेत व इतरही अजून काही माजी सैनिकांचे प्रश्न असतील तर यासाठी रविवारी दिनांक २७/०२/२०२२ रोजी ठीक सकाळी १० वा, येथील नगरकर सभागृह,शिवपार्वती मंगल कार्यालय श्रीरामपूर येथे त्रिदल सैनिक सेवा संघाच्यावतीने मेळावा आयोजित करण्यात आले असल्याचे यात म्हटले आहे. यामागे देखील दिनांक ८ फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाच्यावतीने अमृत जवान सन्मान अभियानाबाबत तहसील कार्यालयात मेळावा आयोजित करण्यात आला होता,त्यामध्ये अनेक माजी सैनिक, सेवारत सैनिक, वीरपत्नी ,वीर माता ,वीर पिता, विधवा पत्नी इत्यादी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, त्या मेळाव्यामध्ये जे सैनिकांचे प्रश्न आहेत,अन्याय अत्याचार जमिनीचे मुद्दे शेतातील रस्ते पेन्शनचे मुद्दे,अशा अनेक मुद्द्यांवर वार्तालाप करण्यात आला,परंतु अजूनही बऱ्याच सैनिकांनी प्रकरण दाखल केलेले नाहीत व अजूनही बऱ्याच माजी सैनिकांचे प्रश्न प्रलंबितच असल्याने ते सर्व प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यात येणार आहेत व इतरही अजून काही माजी सैनिकांचे प्रश्न असतील तर यासाठी रविवारी दिनांक २७/०२/२०२२ रोजी ठीक सकाळी १० वा, येथील नगरकर सभागृह,शिवपार्वती मंगल कार्यालय श्रीरामपूर येथे त्रिदल सैनिक सेवा संघाच्यावतीने मेळावा आयोजित करण्यात आला आहे,त्यामध्ये संघटना मजबुती करणासाठी चर्चासत्र आयोजित केले आहे सोबतच माजी सैनिकांना अमृत जवान सन्मान अभियानाचे फॉर्म देण्यात येणार आहेत, तेव्हा सर्व आजी, माजी सैनिकांना आवाहन करण्यात येते की,आपण आपल्या हस्तलिखित अर्जा मध्ये असलेले प्रश्न लिहून संघटनेस सुपुर्द करावेत व या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन त्रिदल सैनिक सेवा संघ या संघटनेचे अहमदनगर उत्तर विभागाचे उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार,तालुकाध्यक्ष अनिल लगड,उपाध्यक्ष संग्राम यादव यांनी केले आहे.