युवक काँग्रेसच्या निवडणुकीत दिपाली ससाणे यांना विक्रमी मते


अहमदनगर : राज्यभरातील युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी झालेल्या ऑनलाईन निवडणुकीत सौ. दिपाली करण ससाणे यांना दोनशे उमेदवारांमध्ये सरचिटणिस पदासाठी १९ हजार २८ इतकी विक्रमी मते मिळाली आहेत.

            युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, प्रदेश महासचिव, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव व विधानसभा अध्यक्ष पदासाठी राज्यभरात १२ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०२१ दरम्यान झालेल्या या निवडणुकीत २०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यापुर्वी बुथवर निवडणुक प्रक्रीया होत होती. मात्र, यावेळी ही मतदान प्रक्रिया ऑनलाईन असल्याने मोठे आव्हान होते. असे असताना देखील सौ. दिपाली करण ससाणे यांना महिला वर्गात राज्यात दुसऱ्या क्रमांकाची विक्रमी मते पडल्याने त्यांच्यावर विवीध स्तरांतुन अभिनंदनाचा वर्षाव होत असुन महसुलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधिर तांबे, सत्यजित तांबे, आ. लहुजी कानडे यांनी सौ.ससाणे यांचे अभिनंदन केले आहे. लोकनेते स्व. जयंतराव ससाणे साहेब मित्र मंडळाचे सर्व सहकारी , युवक काँग्रेस, शहर काँग्रेससह तालुक्यातुन ससाणे कुटुबांवर प्रेम करणाऱ्या सर्वांचे हे यश असल्याचे सौ. दिपाली ससाणे म्हणाल्या.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post