श्रीरामपूर बाजार समितीत सुरु असलेल्या निकृष्ट रस्त्याच्या कामाची होणार तपासणी; शेख व बोरुडे यांनी केली होती तक्रार : शासनाची फसवणूक करणाऱ्या ठेकादारावर कारवाई झालीच पाहिजे
'इन्कलाब' भाग २
श्रीरामपूर : श्रीरामपूर कृषि उत्पन्न बाजार समिती आवारातील रस्त्याचे अत्यंत निकृष्ट पद्धतीने काम करून ठेकेदार शासनाची फसवणूक करत असल्याने कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासंदर्भात 'राजद'चे जिल्हाध्यक्ष इम्रानभाई शेख व सामाजिक कार्यकर्ते राजेश बोरुडे यांनी (दि.२२) कृषि उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडे तक्रार केली होती. दरम्यान, या कामासाठी नेमणूक केलेले वास्तुविशारद कामाची तपासणी करणार आहेत, तसे पत्र त्यांना दिले असल्याचे सचिव किशोर काळे यांनी 'साईकिरण टाइम्स'शी बोलताना आज ( दि.२३) सांगितले.
श्रीरामपूर बाजार समिती आवारात लाखों रुपये खर्चून रस्त्याचे काम सुरु आहे. रस्त्याच्या कामात निकृष्ट मटेरियलचा वापर होत असल्याची तक्रार करूनही ठेकेदाराने काम चालूच ठेवले आहे. ठेकेदारासोबत केलेले करारपत्रे, अंदाजपत्रक, नियम व अटी-शर्तीप्रमाणे रस्त्याच्या कामात खराब मटेरियलचा वापर होत असल्यास काढुन घेऊन चांगले, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण मटेरियलचा वापर करण्याची तरतूद असते. त्यामुळे रस्त्याच्या कामात वारलेले खराब साहित्त्य त्वरित काढुन घेऊन गुणवत्तापूर्ण साहित्त्याचा वापर करून रस्ता करावा, अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाचे जिल्हाध्यक्ष इम्रानभाई शेख व सामाजिक कार्यकर्ते राजेश बोरुडे यांनी केली आहे. 'छाछू' काम करून जनतेचा पैसा खाणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाईची करावी, अन्यथा रस्त्याचे काम बंद पाडून आंदोलन उपोषण करण्यात येईल, असा सज्जड इशारा शेख व बोरुडे यांनी दिला आहे.
भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी २९ जानेवारी २०२२ रोजी या कामाचे मोठा गाजावाजा करून उदघाटन केले होते. ठेकेदारावर कोणाचाही वचक नसल्याने विखेंनी उदघाटन केलेल्या रस्त्याचे खराब काम करून शासनाचा पैसा हडप कारण्याचे काम ठेकेदार करत आहे. राष्ट्रीय जनता दलाचे जिल्हाध्यक्ष इम्रानभाई शेख व सामाजिक कार्यकर्ते राजेश बोरुडे यांनी बाजार समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सचिव यांच्याकडे रस्त्याचे निकृष्ट कामाची तक्रार करून ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. रस्त्याच्या कामात काळाभोर पाषाण वापरणे आवश्यक असताना विहिरीचा ठिसूर, कच्चा बादड दगड व मातीमिश्रित मुरूम वारण्यात येत आहे. बाजार समिती आवारात अवजड वाहतूक असते. त्यामुळे शासनाने रस्त्यासाठी मोठा निधी मंजूर केला. परंतु, थातूरमातुर काम करून जनतेचा पैशाने स्वतःचे खिसे भरण्याचे काम ठेकेदार करत आहे. या रस्त्याचे काम त्वरित बंद करून शासनाची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा व ठेकेदाराला या कामाचे देयके अदा करू नये, अन्यथा उपोषण, आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय जनता दलाचे इम्रानभाई शेख व सामाजिक कार्यकर्ते राजेश बोरुडे यांनी दिला आहे.... क्रमशः