श्रीरामपूर : तालुक्यातील कारेगाव-अशोकनगर रस्त्याच्या कामासाठी हाडपलेल्या खासदार निधीचा पुरावा नष्ट करण्यापूर्वी पंचनामा करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी छवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांच्या शिष्टमंडळाने पंचायत समितीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर -कारेगाव रस्ता हा सण २०१८-२०१९ व सण २०१९-२० मध्ये दोन वेळा तत्कालीन आमदार भाऊसाहेब कांबळे तसेच तत्कालीन खासदार सदाशिव लोखंडे यांच्या निधीतून २५/१५ हेड नुसार मंजूर झाला, असे सांगत थाटा-माटात जगताप वस्ती शनी मंदिरात उत्घाटन करून त्या ठिकाणी जि परिषद बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते हजर राहून काम कसे होणार हे सर्व लोकांच्या समोर सांगून त्या रस्त्यावर जगताप वस्ती ते म्हसोबा मंदिर कारेगाव या ठिकाणी दोनवेळा खडी टाकली पण काम झालेच नाही.
माहिती अधिकारात माहिती घेतली असता या रोडवर कोणताही निधी दोन वर्षात खर्च झाला नसल्याचे पंचयत समिती उपभयंता सांगताहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता यांचेकडे चौकशी करता काहीच माहिती देत नाही. दि 20/12/2021रोजी सदर प्रकरणी प्रांताधिकारी यांना चौकशी करण्यासाठी निवेदन दिले होते. त्याची प्रत सार्वजनिक बांधकामचे अधीक्षकअभियंता याना तसेच जिल्हापरिषदेच्या कार्यकारीअभियंता यांना दिली असता कोणतीही चौकशी करण्यातआली नाही. आता त्या अशोकनगर कारेगाव रस्त्यावर कोणी दोनवेळा खडी टाकली आणि रस्ता न करता बिल काढले. याची चौकशी आपल्या विभागामार्फत करावी तसेच तत्कालीन आमदार खासदार यांच्या निधीची चौकशी करावी आणि दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी, ही मागणी आम्ही पुन्हा करत आहोत. आता त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या ३०/५४ च्या हेड नुसार पुन्हा खडी टाकण्याचे काम सुरू आहे. ते सुरू करताना जगताप वस्ती ते म्हसोबा मंदिर याच दरम्यान आहे तिथे साईडगटर न खोदता तसेच तेथे मोठा ओढा असून सिडीवर्क न करता थेट काम सुरू करण्यात येतआहे ,विशेष म्हणजे मागील ठेकेदारांची टाकलेली खडी पण जमा करून मागील हडप केलेला निधी ची निशाणी गडप करण्याचं काम येथे सुरू आहे तरी आमची अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने आपणास विनंती आहे की या सर्व प्रकारची तसेच तत्कालीन प.स.बांधकाम उपअभियंता श्रीरामपूर चौकशी करावी
या रोडचे काम सुरू करायचे झाल्यास तेथे स्थानिक ग्रामस्थां सह ग्रामसेवक तलाठी यांचा पंचनामा घेऊन, त्याचप्रमाणे म्हसोबा मंदिरा शेजारी सी डी वर्क मंजूर करण्यासाठी प्रस्ताव करावा, अंदाजपत्रक प्रमाणे काही ठिकाणी ओढ्याचे पाणी जाण्यासाठी योग्य आकाराचे सिमेंट पाईप टाकून द्यावे ,तसेच यावरून अशोक कारखान्याची ऊस वाहतूक ही बैलगाडीने जास्त प्रमानावर आहे त्यास पर्यायी रस्ता (सर्व्हिस रोड करावा)कारखान्यास पत्र देऊन पर्यायी मार्गाने वाहतूक करावी आणि या रस्त्यासाठी वापरात येणारी खडी, मुरूम, डांबर इतर साहित्य दर्जा तपासून घ्यावे ही सर्व उपाययोजना न करता कामसुरु झाले तर कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
निवेदनावर नितीन पटारे (जिल्हा अध्यक्ष छावा), शरद बोंबले (श्रीरामपूर शहर प्रमुख), प्रवीण देवकर(जिल्हा सरचिटणीस), बहिरनाथ गोरे (जिल्हा मार्गदर्शक), संजय जगताप (मार्गदर्शक), गोरख शेजुळ (शहर कार्याध्यक्ष), भास्कर बाराशे, चंद्रकांत नागुडे आदींची नावे आहेत. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकार, तहसीलदार, जिल्हा परिषद कार्यकारीअभियंता (बांधकाम विभाग उत्तर), अप्परपोलीस अधीक्षक श्रीरामपूर, गटविकास अधिकारी आदींना पाठविण्यात आल्या आहेत.