घाणीचे साम्राज्य ..! झोपी गेलेल्या पालिका प्रशासनास जाग आणण्यासाठी जे.जे.फाऊंडेशन घंटानाद आंदोलन करणार !


साईकिरण टाइम्स | ९ फेब्रुवारी २०२१

श्रीरामपूर | शहरातील गोंधवणी रस्त्यावरील कालव्याच्या पुलाखालील परिसरात घाणीचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाले आहे. परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून, झोपी गेलेल्या पालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी घंटानाद आंदोलन करणार असल्याचा, इशारा जे.जे.फाऊंडेशनचे अध्यक्ष जोएफ जमादार यांनी दिला आहे.

                प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हंटले आहे कि, सध्या श्रीरामपूर शहरात सर्वत्रच घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नगर पालिका प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. गोंधवणी रोड हा परिसर अत्यंत गजबजलेला परीसर असून मोठी लोकवस्ती याठिकाणी आहे. मात्र, गोंधवणी रोडवरील पाटाच्या पूलाखाली नेहमीच काही  चिकन, मटण विक्रेते कोंबड्यांची पंख आणि इतर घाण याठिकाणी आणुन टाकतात. यामुळे याठिकाणी मोकाट कुत्र्यांचा मोठा वावर अधिक प्रमाणात असतो.  रस्त्याने ये - जा करणाऱ्या नागरीकांना, शालेय विद्यार्थी, लहान बालकांच्या अंगावर येथील मोकाट कुत्रे धाऊन जातात. शहरातील काही नागरीक आपली मेलेली जनावरे शेळी, मेंढी, कुत्रे याठिकाणीच आणून टाकतात. मात्र या पुलाखाली पुर्वीच साचलेले घाण पाणी असल्याने त्यात सदरील मेलेली जनावरे अक्षरश:सडून परिसरात प्रचंड प्रमाणात नेहमीच दुर्गंधी पसरते. यामुळे नागरीकांच्या आरोग्याचा भयानक प्रश्न निर्माण होतो आहे. हे सर्व अवगत असताना देखील संबधीत नगर पालिका प्रशासन स्वच्छता विभाग (ठेकेदार) 'असूनी डोळे, पण अंधाळे' अशी सातत्यानेच भुमिका बजावत असल्याने नागरीकांना नाविलाजास्तव मोठ्या प्रमाणात या दुर्गंधीच्या त्रासाचा सामना करणे भाग पडत आहे. 

              शहरातील अस्वच्छतेबाबत जे.जे. फाऊंडेशनने नगर पालिका प्रशासनास अनेकवेळा कळवूनही आणि उपोषणे करुनही केवळ खोट्या आश्वासनव्यतिरिक्त  काहीच उपयोग होत नाही. कोणीच दखल घेत नाही. अशी भयानक आवस्थेतून या परीसरातील नागरीकांना नेहमीच या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. जे.जे.फाऊंडेशन झोपी गेलेल्या नगर पालिका प्रशासनास जाग आणण्यासाठी घंटानाद आंदोलन करणार आहे. नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे आणि नागरीकांना त्रासापासून मुक्त करावे; अन्यथा शहरातील नागरीकांना स्वच्छता ठेकेदाराच्या भरवशावर सोडणाऱ्या आणि नागरीकांच्या आरोग्याशी खेळू पाहणाऱ्या  नगरपालिका प्रशासन, लोकप्रतिनिधींना येत्या नगरपालिकेच्या निवडणूकीत याची मोठी किंमत चुकती करावी लागेल असेही पत्रकात म्हटले आहे. या पत्रकावर 'जे.जे.फौंडेशन'चे जोएफ जमादार,असिफ तंबोली, गुड्ड जमादार, अल्तमश शेख, अरबाज कुरैशी, जकरिया सैय्यद, मुबसशीर पठान,अनवर तंबोली, दानिश पठान, शादाब पठान,नईम बागवान, शाहिद शेख, फरहान शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post