साईकिरण टाइम्स | ५ फेब्रुवारी २०२१
श्रीरामपूर | केंद्र सरकारने संपूर्ण देशात इंधन तसेच घरगुती गॅसचे भाव प्रचंड वाढवले आहे. राज्यात इंधन दरवाढीविरोधात शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. पेट्रोल-डिझेल, गॅसच्या 'भाववाढी'विरोधात श्रीरामपूरात शुक्रवारी (दि.५) शिवसेनेने आंदोलन केले. दरवाढ त्वरित मागे घेण्याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मोदी सरकार बहुमताचा गैरवापर करत असल्याचा आरोप शिवसेना शहर प्रमुख सचिन बडदे यांनी केला.
यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन बडदे म्हणाले, मोदी सरकारला एकदा नव्हे तर दोन वेळेस जनतेने पूर्ण बहुमत दिले; पण मोदी सरकार या बहुमताचा गैरवापर करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत आज सर्वात कमी असताना सुद्धा पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅसचे प्रचंड भाव सरकारने वाढवून ठेवले आहे. सर्व वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. मागील वर्षी कोरोनामुळे अनेक नागरिकांचे रोजगार गेले. अनेकांचे व्यवसाय मोडकळीस आले. तरूणांच्या हाताला रोजगार नाही .बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशावेळी इंधन दरवाढीने सामान्य लोकांचे अजून प्रचंड हाल होत आहे. या इंधन दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना ही मोठ्या प्रमाणात बसत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला मालाला भाव नाही असे असताना इंधनाचे दर वाढवून शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. तिकडे शेतमालाला भाव नाही तर दुसरीकडे ट्रॅक्टरसाठी लागणारे डिझेलचे दर खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतीची मशागत करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. परिणामी शेती धंदा मोडकळीस येणार आहे.
मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी आज शिवसैनिकांनी आंदोलन केले. केंद्र सरकारने ही दरवाढ मागे घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी मोदी सरकारचा निषेध करून श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे, जिल्हा संघटक डॉक्टर महेश शिरसागर, तालुका प्रमुख दादा कोकणे, बेलापुर शहर प्रमुख लखन भगत, युवा सेना शहर प्रमुख निखिल पवार, ज्येष्ठ शिवसैनिक यासीन भाई सय्यद, रामा शेठ अग्रवाल मदनलाल बत्रा, सुभाष जी जंगले, सागर हरके, रमेश घुले, किशोर फाजगे, अरुण पाटील अशोक थोरे ,संदीप जगधने, बाळासाहेब गायकवाड , विष्णू मोढे, सुरेश बारस्कर, सागर हरके,रोहित भोसले, निलेश पाटणी, शरद डोळसे, किशोर नाईक, कैलास पुजारी कैलास भणगे, शुभम ताके, शुभम आढाव, सतु महाराज गौड, प्रदीप वाघ, सुधा तावडे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.