श्रीरामपूरात रविवारी असंघटित कामगारांचा मेळावा व नावनोंदणी

साईकिरण टाइम्स | ५ फेब्रुवारी २०२१

श्रीरामपूर | श्रीरामपूर तालुक्यातील असंघटित कामगारांचा मेळावा व नोवनोंदणी अभियानाचा शुभारंभ रविवार ‍दि.७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता श्रीरामपूर बेलापूर रोड येथील आमदार लहूजी कानडे यांच्या यशोधन कार्यालय येथे होणार आहे.

               या कार्यक्रमास आमदार लहूजी कानडे  व अहमदनगर जिल्हा असंघटीत कामगार काँग्रेस कमिटी अध्यक्ष संजय कोल्हे  व प्रा. बाबा खरात आदिवासी समाजसेवक हे मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष इंद्रनाथ पाटील थोरात, श्रीरामपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सचिन गुजर हे उपस्थित राहणार आहेत.  

             असंघटीत कामगारांमध्ये गवंडी, पेंटर, बांधकाम मजूर, सेंटरींग मजूर, स्लायडींग कामगार, वेल्डर, पी.ओ.पी. मजुर, रोजगार हमी मजूर, टायर कामगार, इलेक्ट्रीशयन, फिटर, वीट भट्टी कामगार, खडी क्रशर कामगार, गटार कामगार, खाण कामगार, सुतार, लोहार, विहिर व बोअरवेल कामगार तसेच हॉटेल कामगार  यांचा समावेश करण्यात येणार असून सदर असंघटीत कामगारांसाठी  विविध योजना व शासनामार्फत देण्यात येणा-या सुविधा संदर्भात मार्गदर्शन त्याचप्रमाणे सुविधांचा लाभ मिळवून देणे यासाठी नाव नोंदणी करण्यात येणार आहे.

               या कार्यक्रमासाठी कामगारांनी या मेळाव्यास येताना आपले आधारकार्ड, रेशनकार्ड, रहिवासी दाखला, व्यवसायाचा दाखला व बँकखाते पासबूक या कागदपत्रांसह श्रीरामपूर येथील आमदार लहू कानडे यांच्या यशोधन कार्यालय, बेलापूर रोड, श्रीरामपूर येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, तालुकाध्यक्ष अरुण पा. नाइक, तालुका उपाध्यक्ष आबा पवार, नितीन सोनवणे यांनी केले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post