साईकिरण टाइम्स | ७ फेब्रुवारी २०२१
उक्कलगाव | प्रतिनिधी | श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील तळोली ओढा दुरूस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, निधी उपलब्ध होताच तातडीने नाल्याचे खोलीकरण-दुरुस्तीचे काम पूर्ण करू, अशी ग्वाही खा. लोखंडे यांनी यावेळी शेतकर्यांना दिली.
तालुक्यातील प्रवरानगर - बाभळेश्वर - ममदापूर - गळनिंब येथून येणारा व उक्कलगाव - लम्हाणबाबा शिवारातून जाणारा तळोली नाला (ओढा) नाल्याची दुरूस्तीची मागणी नुकतीच शेतकऱ्यांनी केली आहे. नाल्याची दुरूस्ती नसल्यामुळे लम्हाणबाबा शिवारातील शेतकर्यांचे पिकांचे कायमच मोठे नुकसान होत आहे. येथील क्षेत्रात पाणीच पाणी साचले जात आहे. दरवर्षी देखील खरीपातील व रब्बीमध्ये या सर्वच शेतकर्यांना कोणतीही पिके घेता नाहीत. स्थनिक विकास निधीतून नाल्याचे खोलीकरण दुरुस्ती करण्यात यावी अशी, मागणी पंचक्रोशीतील शेतकर्यांनी केली. दिंगबर मोरे, सुरेश रामराव थोरात, देवीदास थोरात, अनिल थोरात, विकास थोरात, कैलास थोरात, भास्कर थोरात, विठ्ठल थोरात, अतुल थोरात,अशोक थोरात, भगवान थोरात, आदी सह शेतकर्यांच्या निवेदनात सह्या आहे.