नदीपात्रालगत बिबट्याचा बछडा आढळला


साईकिरण टाइम्स | २ फेब्रुवारी २०२१

उक्कलगाव (प्रतिनिधी) श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरानदीपात्र शिवारात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असताना, राहुरी  तालुक्यातील तिळापूर - वांजुळपोर्ई येथील प्रवरा नदीपात्र शिवारातील जगताप यांच्या शेतात नवजात बिबट्याचा बछडा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

                   मंगळवारी सकाळी बिबट्याचा बछडा येथील शेतकऱ्यांना निदर्शनास आढळून आला. साधारण २५ ते ३० दिवसांचा नवजात बछडा असल्याचे वनधिकाऱ्यांनी सांगितले. येथील नागरिकांनी तातडीने वनविभागाला माहिती देण्यात आली असता राहुरीचे वनविभागाचे पवन निकम, गोरक्षनाथ मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन बछड्याला ताब्यात देण्यात आले. 

                           सध्या परिसरात रात्रीची वीजपुरवठा असल्याने कांदा, व गहू पिकांसाठी पाणी भरण्यासाठी शेतात शेतकर्‍यांना जावे लागत आहे, वनविभागाने शेतकर्‍यांची तक्रार गांभिर्याने लक्षात घेऊन तिळापूर - वांजुळपोई शिवारात पिंजरा लावण्यात यावा, मागणी संबंधित शेतकर्‍यांमधून केली जात आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post