साईकिरण टाइम्स | १ फेब्रुवारी २०२१
श्रीरामपूर | दि. १ ते ७ फेब्रुवारी दरम्यान नगर जिल्ह्यात ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमीत्त काँग्रेस बळकटीकरण सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ सोमवारी ( दि.१) रोजी तालुका काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकारणी सदस्याच्या उपस्थितीत आमदार लहू कानडे यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयातुन झाला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार लहू कानडे होते, प्रमुख उपस्थितीत जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रनाथ पाटील थोरात, जिल्हा उपाध्यक्ष कार्लस साठे, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाइक, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, जेष्ठ कार्यकर्ते अण्णा पाटील थोरात, बाबासाहेब कोळसे, ॲड समीन बागवान उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार लहू कानडे म्हणाले, काँग्रेस हा एक विचार असून तो या सप्ताहानिमीत्त आपणा सर्वांना तळागाळातल्या शोषित, पीडीत व वंचित घटकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी पार पाडणे आवश्यक असून सध्याच्या परिसिथथतीमध्ये देशाला केवळ काँग्रेसचाच विचार तारु शकतो. ना. थोरात साहेब हे राज्याचं नेतृत्व करत असताना देशात त्यांच्या कार्याचा उल्लेख आदरपुर्वक केला जातो, त्यांच्याच बळावर आज राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन अतिशय चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. सप्ताहानिमीत्त तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जनतेच्या कल्याणाकरीता अनेक कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्यामध्ये तालुक्यातील असंघटीत कामगारांच्या विविध योजना कार्यरत करण्याच्या दृष्टीने मेळावा, टाकळीभान येथे भुमीहीन व बेघर नागरिकांचा मेळावा, बेलापूर व उक्कलगाव येथील शेतकरी मेळावा, तालुक्यातील युवकांकरीता विविध मार्गदर्शन मेळावे, तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या सदस्यांचा सत्कार समारंभ व त्याचबरोबर तालुक्यातील तमाम नागरिकांकरीता महाराष्ट्रातील सुप्रसिध्द हास्य कवींचे कवी संमेलन आयोजित करण्यात आल्याचे जाहिर केले. त्याचबरोबर यावेळी बोलताना समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी सप्ताहामध्ये काँग्रेस पक्ष बळकटीकरणाकरीता पक्षाच्या वतीने विविध योजना राबविण्याबाबत विस्तृत स्वरुपात मार्गदर्शन केले. तसेच कार्याध्यक्ष सचिन गुजर यांनी ना. थोरात साहेबांच्या जीवन चरित्राचा प्रभावी उल्लेख कार्यकर्त्यांसमवेत चर्चीला व त्यातून काँग्रेस बळकटीकरण सप्ताह जल्लोषात व शांततामय वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष इंद्रनाथ पाटील थोरात, कार्लस साठे, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाइक, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, बाबासाहेब कोळसे, ॲड समीन बागवान, विष्णुपंत खंडागळे, पवार सर, श्रीरामपूर युवक शहराध्यक्ष अभिजीत लिप्टे, विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट् सचिव अक्षय नाइक, एन.एस.यु. आय. चे जिल्हा कार्याध्यक्ष आकाश क्षीरसागर, यांनी यावेळी सप्ताहा निमीत्त आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतक-यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे ॲङ सर्जराव कापसे, राजेंद्र कोकणे, इसाकभाइ शेख, अन्सारभाइ शेख, मच्छींद्र पारखे, महेंद्र संत, सतिष बोर्ड, सुरेश पवार, राजेंद्र औताडे, आबा पवार, रमेश आव्हाड, देवरे सर, सुभाष तोरणे, गौरव सिकची, दत्तात्र कुमावत, विलास अण्णा थोरात, सागर मुठे, कसबे, विठ्ठलराव आसने, योगेश आसने, हरिभाऊ बनसोडे, दिनकर बनसोडे तसेच संपुर्ण तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.